माथेफिरू जवाया विरूद्ध गुन्हा दाखल ,
अमीन शाह
बुलडाणा ,
दारु पिवून आलेल्या घर जावयाने पत्नी , सासू ला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत कुटुंब संपविण्याच्या उद्देशाने घर पेटविले . यामध्ये घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . ही घटना ३ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली . याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जावयास अटक केली आहे . याबाबत असे की , संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील कस्तुराबाई साहेबराव मंडासे वय ६० यांचा जावई अंबादास कैलास झाल्टे वय ४५ हा दारु पिण्याच्या सवयीचा होवून दारु पिवून पत्नीला व सासूला मारहाण व शिविगाळ करायचा . ३ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास अंबादास झाल्टे हा दारु पिवून आला व कस्तुराबाई यांना त्याने मोबाईल मागितला . व त्यानंतर मोबाईल घेवून अंबादास याने पत्नीसोबत वाद करुन शिविगाळ करुन मारहाण केली व मोबाईल जमिनीवर आदळून फोडून टाकला . यावेळी कस्तुराबाई यांनी मोबाईल का फोडला असे विचारले असता अंबादास याने पत्नीला व सासूला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली . एवढ्यावरच न थांबता अंबादास याने कुटुंबाला संपविण्याच्या उद्देशाने घर पेटविले . यामध्ये घरातील कपडे , बॅग , महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली . तर घरात असलेली पत्नी , नातवंडे , सासू बाहेर पडल्याने बचावले , अशी तक्रार कस्तुराबाई मंडासे यांनी सोनाळा पोस्टेला दिली . यावरुन सोनाळा पोलिसांनी अंबादास झाल्टे विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यालाअटक केली आहे .