Home विदर्भ हिवरी येथील अनेक कुटुंब घरकुलापासुन वंचित…!

हिवरी येथील अनेक कुटुंब घरकुलापासुन वंचित…!

453

पात्र लाभार्थ्यांना ही करावा लागणार जाचक अटीचा सामना – उपसरपंच अभिजीत मुरखे

देवानंद जाधव

यवतमाळ / हिवरी –  हिवरी हे गाव काही प्रमाणात आदीवासी बहुल गाव खुप प्रतिक्षेनंतर आपल्याला घर मिळावं यासाठी शासनाकडे टक लावून बघत असलेला भोळा भाबळा समाज आज घरकुल यादी प्रपत्र’ड’ ला प्रकाशित केल्या नंतर पुरता नाराज झाला.हिवरी येथील ४६२ पैकी १६५ कुटुंबे प्रतीक्षायादीत आले.उर्वरीत २९६ कुटुंब जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या घोडचूकीमुळे अपात्र झाले. त्या अपात्र कुटुंबाचा प्रशसनाकडून फेर सर्व्हे करण्यात यावा.व घरकुलाच्या प्रतिक्षायादी संदर्भात शासनाने प्रपत्र’ड’ला घेऊन नवीन आदेश काढले असून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुलापासुन वंचित ठेवण्याकरीता या जाचक अटी व निकष लावण्याचा आरोप हिवरी येथील उपसरपंच अभिजीत मुरखे आणि ग्रामस्थांनी केला आहे.पंतप्रधान आवास योजनेमध्ये ग्रामीण भागातील कोणताही लाभार्थी पात्र होणार नाही.या तुघलकी अटी आडव्या केल्याने या शासन निर्णयाचा गावातील लोकप्रतिनिधीनी निषेध केला आहे. शासनाने पात्र लाभार्थ्यांना घरकुलापासुन वंचित ठेवण्याकरिता १६ जाचक
अटी तयार केल्या आहेत. त्यामध्ये लाभार्थी कुटुंबाकडे पक्के घर नसावे, कुटुंबाकडे कोणतेही वाहन नसावे, लाभार्थी कुटुंबाने ५० हजारांपेक्षा जास्त पीककर्ज घेतलेले नसावे. लाभार्थी कुटुंबात कोणीही सरकारी कर्मचारी नसावा. लाभार्थी कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा दहा हजारांपेक्षा जास्त कमविणारा नसावा. लाभार्थी कुटुंबाकडे अडीच एकरपेक्षा जा
जास्त जमीन नसावी. कुटुंबाकडे फ्रिज नसावा. या सर्व जाचक अटी घरकुल लाभार्थ्यांना घरकुलापासुन वंचित ठेवण्याकरिता शासनाने हेतु परस्पर तयार केलेल्या आहेत. गावातील सर्व लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी निकषांसंदर्भात रोष व्यक्त केला. या निकषांविरोधात हिवरी येथील उपसरपंच अभिजीत मुरखे व ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही दिला. शासनाने अपात्र यादीतील लाभार्थ्यांचा फेर सर्व्हे करुन त्यांचा पात्र यादीत समावेश करावा. व सर्व अटी मागे घेऊन पंचायत समिती स्तरावरून यादी घोषित करावी व तालुक्यातील हिवरी, भांब,रूई,वाई, बोथबोडण,जांब, अर्जुना,किन्ही,मनपुर या गावातील सर्व लाभार्थ्यांना घरकुलास पात्र करावे अशी मागणी केली आहे.