Home विदर्भ महाराष्ट्र राज्य नपा व मनपा शिक्षक संघ जिल्हा यवतमाळ कडून जिल्हाधिकारी यांना...

महाराष्ट्र राज्य नपा व मनपा शिक्षक संघ जिल्हा यवतमाळ कडून जिल्हाधिकारी यांना निवेदन

346

यवतमाळ – शासनाकडून नगरपालिकेला 10 टक्के व 20 टक्के शिक्षक अनुदान वेळेत मिळत नाहीत त्याच बरोबर मागणीनुसार शिक्षक अनुदान कमी मिळते. परिणामी काही हप्ते शिक्षक अनुदानाचे नगरपालिकेकडे थकीत राहतात.त्यामुळे शिक्षकांचे वेतन उशिरा होते.

शासन निर्णयानुसार नगरपालिका शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला होणे करिता शासनाकडून शिक्षक अनुदान वेळेत व मागणीनुसार मिळावे. तसेच जिल्ह्यातील पांढरकवडा वणी,घाटंजी,आर्णी नगरपालिकेतील शिक्षकांना नक्षलग्रस्त भत्ता मिळावा. तसेच 2004 नंतर नियुक्त शिक्षकाला सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटी दुरुस्त करण्यात यावी.याबाबत आज दि.7 ऑक्टोबर रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब व मा.मुख्यमंत्री साहेब यांना महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

त्यानंतर संघटनेने कॅनरा बँकेच्या मॅनेजर सोबत OD व SGPC.स्कीम बाबत सविस्तर चर्चा केली. वरिष्ठांशी बोलून कोणकोणत्या योजना देता येईल याबद्दल दोन दिवसात सांगतो.असे मॅनेजरने सांगितले. त्यानंतर नगरपालिकेतील लेखापाल श्री चव्हाण यांची भेट घेतली असता शिक्षक अनुदान येताच शिक्षकांचे पगार करू असे श्री.चव्हाण सांगितले.यावेळी जिल्हाध्यक्ष मा.सुनील जाधव,राज्य संपर्कप्रमुख मा.विनोद चव्हाण, राज्य सहचिटणीस मा.संजय चूनारकर, विभागीय उपाध्यक्ष डॉ. विनोद डवले, जिल्हा प्रतिनिधी मिर्झा आतीफ बेग, धर्मा पवार अध्यक्ष, राजू कुडमेथे सरचिटणीस, युसुफ खान उपाध्यक्ष, लक्ष्मीकांत कांबळे कोषाध्यक्ष,असरार खान संघटक, निवृत्ती आंबेकर सहकोषाध्यक्ष, शाकीर असलम सहसचिव, अनिल हाके सदस्य इत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.