Home मराठवाडा वडीलासह त्यांच्या पाल्यांना विनाशर्त जातवैधता प्रमाणत्र द्या – उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे...

वडीलासह त्यांच्या पाल्यांना विनाशर्त जातवैधता प्रमाणत्र द्या – उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

694

औरंगाबाद/प्रतिनिधी

शैक्षणीक कारणासाठी दाखल करण्यामत आलेल्या कोळी महादेव जमातीचा दावा अवैध ठरविल्याने दाखल याचिकेत, औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती एस.व्ही . गंगापुरवाला आणि न्यायमुर्ती आर.एन. लड्डा यांनी याचिकाकर्त्यांना विनाशर्त कोळी महादेव जमातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यााचे आदेश औरंगाबाद अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिला.


नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थिनी कु. पुजा नरसिंग यलमलवाड, तिचे वडील नरसिंग इरन्ना यलमलवाड आणि इतरांनी शैक्षणीक कारणासाठी कोळी महादेव जमातीचा दावा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठविला होता. त्यात सन १९५० चा आजोबांचा शालेश प्रवेश निर्गम उतारा जोडण्यात आला. ज्यात जातीच्याा रकाण्यात कोळी महादेव असे नमुद करण्यात आले आहे. तसेच खासरा पाहणी पत्रात देखील कोळी महादेव अशी नोंद आहे. असे असतांना देखील २८ जुलै २०२१ रोजी औरंगाबाद अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने यलमलवाड यांचा दावा अवैध ठरवला. याविरोधात यलमलवाड यांनी *अड. उमेश गिते* यांच्‍या मार्फत खंडपीठात दाद मागितली. याचिकेचत अॅड. गिते यांच्या‍ वतीने वरिष्ठ विधितज्ञ अॅड. महेश देशमुख यांनी युक्तीवाद केला.

अँड. उमेश गिते
8888892257