प्रतिनिधी
गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भगवान सानप यांच्या नेतृत्वाखाली शीट्टीनाद मोर्चा सोमवारी आयोजित करण्यात आला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ् यांनी लेखी स्वरूपात आपला जाहीर पाठिंबा शनीवारी दिला.
पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसान, पिक विमा ,रस्त्याचे प्रश्न आधी सारख्या महत्त्वाच्या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद चे सदस्य भगवानभाऊ सानप यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा सोमवारी तहसील वर धडकणार आहे. या मोर्चास परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ् यांनी शनिवारी भगवान सानप यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपला लेखी पाठिंबा व्यक्त केला. या मोर्चास धनगर साम्राज्य सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या पाठिंब्याचे भगवान सानप यांनी स्वागत केले..