Home वाशिम शेलुबाजारनजीक कारचा अपघात,दोघे गंभीर जखमी

शेलुबाजारनजीक कारचा अपघात,दोघे गंभीर जखमी

129

भिषण अपघातातील जखमींच्या मदतीसाठी ते धावले देवदुत

फुलचंद भगत

वाशिम:-दि.१० आक्टोबरच्या सकाळी ११: ३० च्या सुमारास शेलुबाजार पासुन अवघ्या २ किमी अंतरावर चारचाकी चा भीषण अपघात घडला.
यावेळी साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ति व्यवस्थापन बचाव पथकाचे सदस्य आदित्य इंगोले, आकाश हिवराळे, सतिष गावंडे रस्त्याने जात असताना त्यांना जखमी गंभीर अवस्थेत पडलेले होते. अकोला वरून चारचाकी नांदेड येथे जात असताना शेलुबाजार नजीक इंडिगो गाडीचा टायर फुटल्याने सदर गाडी रस्ताच्या कडेला असलेल्या मुरूमाच्या ढिगावर गेली यामुळे सदर गाडी २ वेळ पलटी झाली. यामुळे गाडीत असलेले ५ ही जण जणु फेकल्या गेले. यामध्ये एका लहान बाळाचा देखील समावेश होता. यावेळी साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ति व्यवस्थापन बचाव पथकाचे सदस्य तत्काळ घटनास्थळी धावून गेले. यावेळी गाडी पटली झाल्याने सदर गाडीखाली २ जण दबले. यावेळी सदस्यांनी तत्काळ गाडी बाजूला करून दबलेल्या जखमींना बाहेर काढले. यावेळी रक्तस्राव जास्त होत होता.
लगेच १०८ अॅन्बुलन्स ला पाचारण केले. मात्र अॅन्बुलन्स ला पोहचायला वेळ होता. तोपर्यंत खाजगी वाहनातून सदर जखमींना ताबडतोब शेलुबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. यावेळी एका जखमी ली आदित्य ने स्वतः च्या गाडीवर नेले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथमोपचार करून पाचही जखमींना अकोला येथे पुढील उपचारासाठी हलविले. यातील २ जणांची प्रकृती चिंताजनक होती. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206