Home अकोला अन , तो निघाला सख्ख्या भावाची हत्या करणारा ??

अन , तो निघाला सख्ख्या भावाची हत्या करणारा ??

119

विनयभंग प्रकरणात पोलिसांनी पकडलेला आरोपी निघाला खुनी ,

सख्ख्या भावाची केली होती हत्या ,

अमीन शाह

अकोला ,

कधी कधी असा होतो की करायला गेले काय अन झालं काय पोलीस विनयभंग अपहरणाचा तपास करायला गेले अन , प्रयसीच्या खातीर सख्ख्या भावाची हत्या करणारा आरोपी हाथी लागला विशेष म्हणजे दोन वर्षा पूर्वी झालेली घटना आज उघडकीस आली आहे , या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार ,एका पित्याने अकोला जिल्ह्यातील पातूर पोलिसात तक्रार दाखल केली की त्यांच्या मुलीचे अश्लिल व्हिडीओ काढुन एक जन पैशाची मागणी करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आहे त्या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी विरूद्ध ५४३/२०२१ कलम ३५४ अ , ३५४ ड , ३८५,५०० , ५०४ , ५०६ भादवी . सहकलम ६६ ९ , ६७ माहीती तंत्रज्ञान ( सुधारणा ) अधिनियम २००८ सहकलम ३ ( १ ) ( w ) ( i ) ( ii ) , ३ ( १ ) ( r ) ( u ) ( s ) , ३ ( २ ) ( va ) अनु.जाती जमाती अत्याचार प्रतीबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास हाती घेतला होता. पोलीस स्टेशन पातुर चे ठाणेदार श्री हरिष गवळी डी बी पथक यांनी सदर गुन्हया बाबत तात्काळ दखल घेवुन पोस्टे चे डि बी पथक प्रमुख पोलिस उप निरक्षक मिरा सोनुने व पथक यांना आरोपी पकडण्याबाबत मार्गदर्शन करून आरोपीस पकडण्या बाबत आदेशीत केल्याने अवघ्या काही तासातच वाशिम येथुन आरोपी योगेश विलास इढोळे वय २३ वर्ष रा . इनामदार पुरा वाशिम यास पूसद नाका वाशिम येथील बालाजी हॉटेल मधुन घेराव घालुन तात्काळ ताब्यात घेतले . गुन्हयातील आरोपीस गुन्हया संबंधाने पोलीस उप अधिक्षक श्री संतोष राउत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना आरोपीच्या मोबाईल फोनची पाहणी करीत असताना मोबाईल फोनवरील एका मॅसेज वरून संशय आल्याने आणखी सखोल चौकशी करता करता गुन्हयातील आरोपी योगेश इढोळे याने २ वर्षापुर्वी केलेल्या खुनाच्या गुन्हयाची कबुली दिली . आरोपी योगेश इढोळे याने त्याच्या प्रेमिकेशी संबंध ठेवल्याच्या संशयावरून त्याचा सख्खा भाऊ गजानन इढोळे ( मयत ) यांस पुण्यास बोलावुन त्याचा साथीदार प्रविण उर्फ ओम आसरू मुटकूळे याच्या मदतीने दारू पिण्याकरीता शेतात बोलावुन त्यास दारू पाजून स्पिकलर चे लोखंडी पाईप त्याच्या डोक्यात मारून खून करून प्रेत शेताच्या बाजूला खडडा करून त्यात पुरले तब्बल दोन वर्षा पर्यंत या घटनेची कोणास ही साधी भनक सुध्दा लागु दिली नाही तसेच भाउ हा नागपूर येथे कामाला असल्याचे आईस खोटे सांगत राहीला
अशा उघडकिस आलेल्या माहीती वरुन मा . पोलीस अधिक्षक साहेब अकोला यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक सा . यांना सदर घटणेची माहीती देउन त्यांनी त्यांचे हद्दीतील पौड पोलीस स्टेशनला माहीती दिल्याने अप नं २८७/२०२१ कलम ३०२,२०१,३४ भादवीचा गुन्हा दाखल करुन आरोपी नामे प्रविण उर्फ ओम आसरु मुटकुळे यास ताब्यात घेतले . सदरची कार्यवाही ही मा . पोलीस अधिक्षक श्री जी . श्रीधर साहेब , अपर पोलीस अधिक्षक श्रीमती मोनिका राउत , उप विभागिय पोलीस अधिकारी संतोष राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. हरिष गवळी , पोउपनि . मिना सोनुने , वाचक पोउपनि . विलास इंगळे , पोहेकॉ . दिलीप इंगळे , पोहेकॉ . संजय वानखडे , पोकॉ . श्रीकांत पातोंड , पोकॉ . अनिल भुसारे , पोकॉ.सत्यजित ठाकुर , मपोकॉ . सोनाली राठोड चालक पोकॉ.मोहन खिल्लारे , चालक पोकॉ . सुशील वाकोडे यांनी केली ,