Home विदर्भ अनेकांनी हाती घेतला मनसेचा झेंडा…!

अनेकांनी हाती घेतला मनसेचा झेंडा…!

177

प्रतिनिधी:- येरला, हिंगणघाट

वर्धा –  आगामी निवडणुकीचे वारे हिंगणघाट तालुक्यात वेगाने वाहत असताना.मनसेकडे पक्षप्रवेश सुरू झाला वेगवेगळ्या पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांनी मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरित होवून आणि राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या कार्यावर विश्वास ठेवून मनसे मध्ये प्रवेश जोरात चालू आहे.
वडनेर,शेकापुर,पोहणा सर्कल हे राष्ट्रवादी,काँग्रेस,शिवसेना, भाजपा यांचा बालेकिल्ला समजल्या जाते.त्यांचा गोटातून आपली पक्ष बांधणी कशी होईल याचा मनसुबा घेवून मनसे तालुका संघटक जयंत कातरकर आपल्या कार्यकर्त्यांना घेवून अहोरात्र झटत असताना परिसरात दिसून येत आहे.
अतुल वांदीले यांच्या मार्गदर्शनात परिसरातील सरपंच,उपसरपंच यांचा पक्षप्रवेश हा बाकी पक्षांना चिंतेची बाब ठरत आहे.अनेक पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी इंजिनावर स्वार होत मनसेचा झेंडा हाती घेतला.