साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त ,
रहीम शेख ,
मोताळा तालुक्यात धामणगाव बढे पोलिस स्टेशन अंतर्गत असलेले पान्हेरा शिवार येथे स्विफ्ट डिझायर मधून विमल गुटखा वाहतूक करताना पोलिसांना दोघे आढळले शासनाने प्रतिबंधित केलेला केसर युक्त विमल पान मसाला व विमल तंबाखु अशा पांढऱ्या रंगाच्या 30 पोतड्या एकुण मालाची किंमत 145200 व
स्विफ्ट डिझायर पांढऱ्या रंगाची गाडी क्रमांक एम एच 28 एन 18 29 किंमत चार लाख रुपये असा एकूण पाच लाख 45 हजार 200 रुपयाचा माल आरोपी शेख सलीम शेख इस्माईल वय 54 वर्षे राहणर चिखली व सादिक शा मजीदशा वय 24 वर्ष राहणार चिखली यांच्याकडून विक्रीसाठी वाहतूक करतांना बाळगताना मिळून आले तरी आरोपी विरुद्ध कलम 328 188 269 270 272 273 अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला
प्रतिनिधी रहिम शेख.मोताळा
जि.बुलढाणा 9763682277