यवतमाळ / दारव्हा (प्रतिनिधी):-आज दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे.महिलांना दारू पिणाऱ्या पतीमुळे शारीरिक,मानसिक,आर्थिक अशा विविध त्रासाचा सामना करावा लागतो.एवढेच नव्हे तर कधी प्रसंगी जीवही गमवावा लागतो.परंतु पाळोदी यागावि मात्र राजरोस पणे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय खुलेआम ग्रामपंचायत कार्यालय परिसर,बुद्ध विहार परिसर तसेच गावातील विविध ठिकाणी सुरू असल्यामुळे गावातील शांतता भंग होत चालली एम एच ३१बी. बी.४११३ या गाडीने देशी दारू आणून सर्रासपणे खुलेआम विक्री करीत असून याबाबीची योग्य ती चौकशी करून मौजा पाळोदी येथे होत असलेली अवैध दारू विक्री व दारूबंदी करण्यात यावी.अशी तक्रार पाळोदी येथील ग्रामस्थ प्रशांत ठाणे ,भुषण इंगोले,गोलु गायकवाड, दादाराव गवई,
रविंद्र धिरण,राजेंद्र पाणचोरे, वर्षा मानेकर, सौ.मिना येवले, शंकर डहाके,सुगत इंगोले, सौ.निर्मला ढोले,शेषराव खडसे, विष्णु गायकवाड,चंद्रकांत डेरे, सुधाकर कोटमकार, गजानन डहाके,देवका गावंडे,दिनेश गाडे,राजेंद्र खडसे,परमेश्वर येवले यांनी पोलीस स्टेशन दारव्हा,तहसील कार्यालय,ग्राम पंचायत पाळोदी तसेच पोलीस अधीक्षक यवतमाळ, जिल्हा अधिकारी कार्यालय यवतमाळ येथे तक्रारी दाखल केल्या आहे.