Home महत्वाची बातमी मैत्रेयच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना अटक झालीच पाहिजे.

मैत्रेयच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना अटक झालीच पाहिजे.

248

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

अमरावती , दि. २४ :- गुंतवणूकदारांना व्याजासह रूपये मिळालेच पाहिजेत या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र ग्राहक प्रतिनिधी अन्याय निवारण समिती ,अमरावतीचे वतीने मुंबई येथे आझाद मैदानावर मैत्रेय गुंतवणूकदारांनी २३ जानेवारी पासून उपोषण सुरू केले आहे.

आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. उपोषण कर्त्यामधील अंबादास नामदेव वाघमारे , सौ. ललिता वावठ , पुष्पा खंडारे या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. पोलिसांनी त्यांना 3-30 वाजता रुग्णालयात दाखल केले आहे.उपोषणामध्ये अमरावती, चंद्रपूर , अकोला , वर्धा, यवतमाळ , पुणे, जालना , औरंगाबाद ,सोलापूर , मुंबई ,नागपूर, जळगाव , नगर , ठाणे , कल्याण ,गडचिरोली, मलकापूर ,धुळे , सांगली यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपले रुपये परत मिळावे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे उपोषण सुरू केले आहे त्यांची मागणी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांना भेटण्याची असून त्यांनी तातडीने निर्णय घेऊन जलद गतीने रुपये मिळवून देण्याचा तसेच मैत्रेय उद्योग कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना तात्काळ अटक करून मैत्रेय समुहामध्ये गुंतवणूक केलेल्या महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण ग्राहकांचे परतावे व्याजासह परत मिळावे या मागणीसाठी त्यांचे उपोषण सुरूच आहे.
या उपोषणात शेकडो महिला, पुरुष सहभागी असून शासनाने तातडीने दखल घ्यावी. या मागणीसाठी ठाम आहेत या दरम्यान , शासन, प्रशासनाने ही बाब गांभीर्याने न घेतल्यास आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्र ग्राहक प्रतिनिधी अन्याय निवारण समितीच्या या आंदोलनाला राज्यभरातील गुंतवणूकदारांनी पाठींबा दिला आहे शेकडो महीला,पुरूष या साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत.राज्य शासनाने मैत्रेय च्या जप्त केलेल्या प्रौपर्टींचा तात्काळ लिलाव करून गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात पैसे वर्ग करावेत .१९९८ रोजी सुरू झालेल्या मैत्रेय समुहाने १७ वर्षे प्रामाणिकपणे व्यवहार केला परंतु कोट्यावधीची माया जमा झाल्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये मैत्रेयने गाशा गुंडाळला त्यामुळे गुंतवणूकदार सैरभैर झाले असून गुंतवणूकदार लोकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.शासनाकडून मैत्रेयचे परतावे मिळण्याची लेखी हमी मिळाल्याशिवाय , उपोषण स्थळापासून उठायचे नाही.असा निर्धार उपोषणकर्त्यानी केला असून दररोज गुंतवणूकदारांचे लोंढे उपोषणात सहभागी होण्यासाठी दाखल होत आहेत.