Home बुलडाणा चिखली साखरखेर्डा मार्गावर धावणाऱ्या भांगार वाहनांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोखा , ,

चिखली साखरखेर्डा मार्गावर धावणाऱ्या भांगार वाहनांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोखा , ,

338

 

तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी ,

 

प्रा , तंजीम हुसेन

चिखली पोलीस ठाण्या अंतर्गत अवेध प्रवासी वाहतूक वाढली असून चिखली ते साखरखेर्डा या मार्गावर भंगार ना दुरुस्त काळी पिवळी वाहनांव्दारे व्दारे प्रवासी वाहतूक केली जात आहे अक्षरशा वाहना ला लटकावून ही जीवघेणी प्रवासी वाहतूक केली जात आहे भांगार अवस्थेत असलेल्या वाहना मुळे चिखली साखरखेर्डा रस्त्यावर मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे केंद्र व राज्य शासनाने नुकताच एक कायदा पारित केला की 15 वर्षा पेक्षा जास्त जुनी भंगार अवस्थेतील वाहने रस्त्यावर धावणार नाहीत परंतु चिखली व साखरखेर्डा येथे जुनी कागदपत्रे नसलेली अनेक वाहने प्रवासी वाहतूक करीत आहे तरी प्रशासनाने या गंभीर बाबी कडे लक्ष केंद्रित करून सबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मांगणी केली जात आहे ,