Home सोलापुर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुक्यातील सर्व कार्यकारण्या बरखास्त

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुक्यातील सर्व कार्यकारण्या बरखास्त

132

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

सोलालापुर , दि. २५ :- राष्ट्रिय अध्यक्ष आमदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे,राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुक्यातील सर्व कार्यकारण्या बरखास्त करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुक्यातील मागील सर्व कार्यकारण्यांची निवड एक वर्षासाठी करण्यात आली होती त्या कार्यकारणीला एक वर्ष पूर्ण झाल्याने राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी तालुक्यातील सर्व कार्यकारण्या बरखास्त केल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे.
लवकरच माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नविन कार्यकारणी जाहिर करणार असून ज्या कार्यकर्त्यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकारणीवर काम करण्याची इच्छा आहे अशा कार्यकर्त्यांनी 7020745045 व 9763763252 या नंबरवर संपर्क करण्याचे अवाहन ही पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.