प्रा. तनज़ीम हुसैन
चिखली : स्कुटीची डिक्की फोडून त्यातून साडेचार लाख रुपयांची रक्कम लांबविण्यात आली होती. ही घटना १८ सप्टेंबर रोजी चिखली शहरातील वारे पेट्रोलपंपाजवळ घडली होती. या घटनेतील आरोपीचा शोध लावण्यात चिखली पोलिसांना यश आले असून, तो उत्तराखंड राज्यातील रहिवासी आहे.
संजय सिंह उर्फ बद्दु उमाशंकर करवाल (३०, रा. राजगड, जि. मिर्झापूर, उत्तराखंड) याला हल्दानी, नैनिताल येथे चिखली पोलिसांनी अटक केली. आज, १९ ऑक्टोबरला त्याला घेऊन पोलीस चिखलीत दाखल झाले. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संजय सिंह याच्याविरुद्ध इतर राज्यांतसुद्धा चोरी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती चिखली पोलिसांनी दिली.
सावरगाव डुकरे (ता. चिखली) येथील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी अशोक लामखेडे (६२) यांनी या प्रकरणात चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या स्कुटीतून वारे पेट्रोलपंपाजवळून साडेचार लाख रुपये लांबविण्यात आले होते. पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला अटक केली. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक लांडे, पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे, पोहेकाँ अताउल्ला खान, विजय किटे, युवराज राठोड, सुनील रिंढे, कडूबा मुंढे, सुनील राजपूत, अजय ईटावा, मंजुषा चिंचोले यांनी पार पाडली.
कशी केली होती चोरी याचा live विडिओ