ईडी प्रकरणाला आणखी एक वळण….
फुलचंद भगत
वाशिम:-खासदार भावना गवळी यांच्या इडीच्या चौकशीप्रकरणात दिवसेंदिवस नवनविन वळणे येत असुन आता तब्येतीचं कारण सांगत ईडीकडे चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मुदत मागीतली आहे.शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली असून त्यांनी ईडीकडे चौकशीसाठी हजर राहण्यासाठी 15 दिवसांची मुदत मागितली आहे.भावना गवळी यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी ही माहिती दिली आहे.
भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत. तसेच पुढील 15 दिवस गैरहजर राहण्यासाठी त्यांनी ईडीकडून वेळ मागितला असल्याचही इंद्रपाल सिंग यांनी सांगितलं. भावना गवळी यांच्याकडून ईडीला प्रकृतीच्या अस्वस्थाबाबतचं पत्रं देण्यात येणार असून मेडिकल सर्टिफिकेटही देण्यात येणार आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने 29 कोटी रुपयांचं, तर राज्य शासनाने 14 कोटी रुपयांचं अनुदान दिलं. मात्र, 43 कोटी रुपयांचं अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही. उलट 7 कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला. याच घोटाळा प्रकरणी गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.
वडीलाकडुन राजकीय बाळकडु मिळालेल्या कोण आहेत भावना गवळी?
माझी खासदार स्व. पुंडलिकराव गवळी यांच्याकडून भावना गवळी यांना राजकारणाचे बाळकडून मिळाले. त्या पुंडलिकराव गवळी यांच्या सर्वात लहान कन्या आहेत. पुंडलिकराव गवळी यांनी सुरुवातीपासूनच आपल्या चारही मुलींना प्रोत्साहन दिले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भावना गवळी यांनी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला. वडिलांच्या निधनानंतरही भावना गवळी यांनी त्यांच्या राजकारणाचा वसा समर्थपणे पुढे नेला.लहान वयातच राजकीय क्षेत्रात उतरलेल्या भावना गवळी यांनी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला. यानंतर 2004, 2009, 2014 आणि आता 2019 असा सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकात विजय मिळवून उत्तरोत्तर राजकारणातील आपले स्थान भक्कम केले. दांडगा जनसंपर्क आणि कोणत्याही आव्हानाला थेटपणे भिडण्याची धमक या भावना गवळी यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. गेल्या 20 ते 22 वर्षांच्या काळात भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील पाण्यापासून इतर अनेक समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
प्रतीनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206