चौकशी करण्याची मांगणी…!!
एकनाथराव अंभोरे पाटील
हिंगोली / वसमत , दि. २५ :- २०१९ मध्ये शासनाने शेतकरी व या शेतावरून दुसऱ्या शेतीला व गाव वाडी वस्तीला जोडन्यासाठी पुर्वीचे पांदन रस्ते दुरुस्ती करुन त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहाय्यक निधीची वापर करुन किंवा कामाच्या आकाराच्या निधी उपलब्ध करून देण्यात आले होते .
सदर पांदन मुक्त अभियान ही संकल्पना शासनाची होती .त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पांदन रस्ताचे काम हि सुरू करण्यात आले होते त्यातच वसमत तालुक्यातील जानेवारी महिन्यात थोरावा सातेफळ ते लीगी सातेफळ ते लीगी पांदन रस्ता चे काम करन्यात आले आहे .पन सातैफळ लीगी रस्त्याचे काम अर्धवट करून सातेफळ ते लीगी पांदन रस्त्या च्या कामामुळे शेतकरी याना मोठे दुःख वाट्याला आले रस्त्या अभावी त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहे . संबंधीत रस्ता कागदावरच पुर्ण झाले किं काय याची चौकशी होणे गरजेचे आहे.
या अर्धवट रस्त्याचे काम करून अनेक ठिकाणी पूर्ण रस्ता झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे जिल्हा प्रशासनाने या गंभी प्रकरणाची तात्काळ चौकशी करून शेकर्यांना रस्ता मोकळा करून द्यावा अशी मंगणी शेतकरी बांधव करीत आहे .