Home विदर्भ पाटीपुरा परिसरातील अवैध धंदे बंद करावे

पाटीपुरा परिसरातील अवैध धंदे बंद करावे

174

यवतमाळ – स्थानिक पाटीपुरा परिसरात अशोक नगर, आंबेडकर नगर, दलीत गृहनिर्माण सोसायटी, श्रावस्ती सोसायटी, रविदास नगर, सुराणा लेआउट, सेजल रेसिडेन्सी राजाराम नगर, अण्णाभाऊ साठे नगर, डोर्ली पुरा इत्यादी असे छोटे-मोठे परिसर पाटीपुऱ्याचा भाग म्हणून ओळखले जातात. या परिसरामध्ये जुगार, मटका दारू, गांजा या प्रकारच्या व्यसनांनी व त्या संबंधित व्यावसायिकांनी पाटीपुऱ्यात मोठा अड्डा निर्माण केला आहे. समाज विघातक व्यसनांच्या विळख्यात येथील युवक बळी पडत आहेत. या वाईट व्यसनांपासून व अशा प्रकारच्या वाईट व्यसनांपासून युवकांना वाचविण्याचा बिडा सामाजिक संघटना भिम टायगर सेना व परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उचलला आहे. याचाच एक भाग म्हणून शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री पंत यांना या मथळ्याचे एक निवेदन देऊन एवढ्या मोठ्या परिसरातील वाढलेले दारूचे प्रमाण, जुगार, मटका व गांजा विक्री थांबविण्याची आग्रही विनंती केली आहे.

निवेदन देताना परिसरातील युवकांचे नेतृत्व भीम टायगर सेनेचे शहराध्यक्ष विजय धुळे, जिल्हाध्यक्ष अजय शेंडे, संपर्कप्रमुख सुमेध पेटकर, संघटक श्याम मेश्राम, कार्यालय अध्यक्ष विकास मोटघरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील, सुधीर खोब्रागडे, रितेश मुन, सुशील मेश्राम व प्रामुख्याने अखिल महाराष्ट्राचे दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलनाचे मुख्य संघटक उमेश मेश्राम हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी चर्चा करीत असताना ठाणेदार यांनी आश्वस्त केले की अल्पशा दिवसांमध्ये अशा वाईट व्यसनांपासून पाटीपुरा परिसराला मुक्त केल्या जाईल.