प्रतिनिधी:रवि आण्णा जाधव
देऊळगाव राजा:-कै प्रभाकर खांडेभराड शैक्षणिक संस्था द्वारा संचालित स्पोर्ट अकॅडमी देऊळगाव राजाच्या विद्यार्थ्याचे तायक्वांदो कराटे स्पर्धेत यश
गोवा येथे झालेल्या खुल्या नॅशनल तायक्वांदो कराटे स्पर्धेत पहिल्यांदा सहभाग घेऊन देऊळगाव राजा येथील अभिषेक शंकर चव्हाण या विद्यार्थ्याने 40 ते 41 या वजन गटात पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदक पटकावले याबद्दल शहर आणि परिसरातून त्याचे अभिनंदन होत आहे प्रशिक्षक राजेश खांडेभराड सर यांचे मार्गदर्शन आणि सहकारी सर्व मित्र याच्या सहकाऱ्याने हे साद्य करता आले आणि उत्कृष्ट कामगिरी करता आली असे तो सांगतो