पत्रकार पूजा कायंदे यांच्या वर अवैध व्यासकानी केला हल्ला
प्रतिनिधी रवि आण्णा जाधव
देऊळगावराजा :- मागील काही दिवसापासून देऊळगावराजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस कर्मचारी निष्क्रियतेमुळे बालाजी नगरीत अवैध धंद्यांना ऊत आला आहे. जुगार, अवैध दारू, गांजा तसेच चक्री सारखे अवैध धंदे खुलेआम सुरू आहे. एवढेच नव्हे तर या अवैध धंद्यांंवाल्यांच्या वाढत्या दादागिरीमुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दि.१६ आॅक्टोंबर रोजी पत्रकार पुजा कायंदे बसस्थानक परिसरात वृत्त संकलनासाठी गेले असता त्यांच्यावर अवैध धंद्यांवाल्यानी हल्ला करुन जिवे मारण्याची धमकी देत बातमी प्रकाशित करु नका आम्ही पोलिसांना हफ्ते देताता आमचा कोणीही बिगळु शकत नाही अशी धमकी दिली. या प्रकरणाची तक्रार करण्यात आली परंतु पोलिस प्रशासनाच्या वतीने थातूरमातूर कारवाही केली परंतु अवैध धंदे जोरात सुरुच आहे. या अवैध धंद्यामुळे ग्रामीण भागातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात सापडले आहे याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षा पूजा कायंदे यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की देऊळगावराजा शहरातील आराध्य दैवत बालाजी महाराजांच्या नावाने ओळख आहे. सद्यस्थितीत बालाजी महाराजांच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. एकीकडे कोरोनाच्या नियमांत बालाजी महाराजांचा उत्सव सुरु आहे. आणि दुसरीकडे अवैध धंदे सुरु असून नियमांचे उलंधन होताना दिसून येत आहे. श्रीद बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्त येतात परंतु मागील काही दिवसापासून शहरात अवैध धंदाना चांगली उचल खाल्ली आहे त्यामुळे बरेच कुटुंब उघड्यावर आली आहेत शिवाय तालुक्यात गुन्हेगारी सुद्धा खूप वाढली आहे. पोलीस स्टेशनचे दोन किलोमीटर अंतरावर बस स्थानक परिसरामध्ये वरली मटका, अवैध दारू विक्री, जुगार, गुटका व चक्री सारख्या अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत शहरात सकाळपासून मोलमजुरी करून काही मजूर संध्याकाळी हे मेहनतीने कमवलेले पैसे थोड्या लालसेपोटी अवैध धंद्यातगतवत आहेत. त्यामुळे बरेच कुटुंबात भांडण तंटे सुरू झाले आहेत ठाणेदारासह काही पोलिस कर्मचाºयांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे शहरातील कुटुंब उघड्यावर आले आहेत. या अवैध धंदेवाल्यांनामुळे कायद्या व सुव्यवस्था बिगहण्याची दाट शक्यत निर्माण झालेली आहे. मात्र याबाबीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना तसेच या अवैध धंद्यामुळे परिसरातील लोकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. याकडे पोलिस अधिकारी जातीने लक्ष देऊन या पोलीस ठाण्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष पूजा कायंदे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
तीन जणांवर गुन्हा दाखल
पत्रकार तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष व भारतीय मानव अधिकारी शहराध्यक्ष पूजा कायंदे यांच्यावर चार दिवसापूर्वी अवैध व्यवसायिकांनी हल्ला केला आणि बातमी प्रकाशित करू नये अन्यथा जीवे मारू अशी धमकी देणारे अतिक, जमील, नूरानी, यांना धक्काबुक्की केली या तिघांच्या विरोधात देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात पूजा कायंदे यांच्या फियार्दीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु कोणतीच कारवाही करण्यात आली नाही तर पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर रोक लावणार का यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.