Home विदर्भ घाटंजी तालूक्यातील अतिवृष्टी मदतीपासून वगळलेल्या सर्व गावांना तात्काळ समाविष्ट करा अन्यथा आंदोलन...

घाटंजी तालूक्यातील अतिवृष्टी मदतीपासून वगळलेल्या सर्व गावांना तात्काळ समाविष्ट करा अन्यथा आंदोलन छेडणार – मोहण जाधव

242

यवतमाळ- घाटंजी तालूक्यातील शिवणी कूर्ली, पारवा या तिनही महसुल मंडळातील अनेक गावांना अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित ठेवण्यामागे राज्य शासनाचे चुकिचे निकस असून ॲटोमेटीक सॅटेलाईट फोटो ग्राफी मधे शिवणी, कूर्ली, पारवा मंडळातील अनेक गावांची नांवे आलेच नाही, म्हणून तालूक्यातील ५०% शेतकर्यांना मदती पासून वंचित ठेणार का? तालूक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आधीच शेतकरी जेरीस आलेला आहे, अतिशय जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे डबघाईस आलेल्या शेतकर्यांना तोकडी मदत देण्यची घोषणा राज्य सरकारने केले मात्र सरसकट मदत न देता चूकिचे निकस लावून अतिवृष्टीच्या मदती पासून शेकडो शेतकर्यांना वंचित ठेव्याचे काम सत्तेतील आघाड़ी सरकार करत असून शेतकर्यांना आत्महत्या करायला भाग पाडत आहे, हे दुजा-भाव न करता तालूक्यातील सरसकट शेतकर्यांना अतिवृष्टीची मदत देण्यात यावे, अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निवेदन मा. माटोडे तहसीलदार यांना दिले,
याप्रसंगी भाजपा व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष मोहण जाधव, कृ.उ.बा.समिती सभापती अभिषेक ठाकरे, जि.प.सदस्य तथा बॅक संचालक आशीष लोणकर, माजी सभापती रूपेश कल्यमवार, अशोकराव राठोड सरचिटणी जीवन मुद्देलवार, शिवसेना ता.अध्यक्ष, आकाश राठोड़, मधुकर डंभारे, मेघराज राठोड, थावरसिंग चव्हाण, रीतेश बोबडे, राजेश राठोड, आशिष भोयर, अरुन राठोड़, विठ्ठल वाटगुरे, नितेश राठोड, आकाश ठाकरे, पंकज राठोड़, मोतीलाल आडे, शंकर राठोड, प्रविन बुरेवार, निळू राठोड़, गुणवंत लेंडगुरे, मुज्जु पटेल, गौरव चौधरी, राजेश चव्हाण, प्रमोद कदम, संदिप खवास, रामोल राठोड़, संदीपसिंह ढालवाले यांचेसह तालूक्यातील शेतकर्यांच्या उपस्थित निवेदन देवून तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आले.