पत्रकार राम खुर्दळ यांची प्रचारप्रमुख तर प्रशांत भरवीरकर यांची जिल्हा संघटक पदावर झाली निवड
नाशिक – संत निवृत्तीनाथ महाराज जगाचे जगतगुरु आहेत.त्यांचे तीर्थ त्रंबकेश्वरी भव्यदिव्य वैभव संपन्न मंदिर बांधा. गेल्या अनेक वर्षे या साठी वारकरी महामंडळाने संघर्ष केला,पाठपुरावा केला.अजुनही ही उपेक्षा थांबत नाही.वारकरी महामंडळाचे संस्थापक हभप रामदास बाबा मनसुख यांचे स्वप्न साकार करायचे आहेत.असे विचार निफाड (ता नाशिक)येथील तालुका वारकरी महामंडळ कार्यकारिणी पद्ग्रहन कार्यक्रम (दि २३)रोजी झाला.
यावेळी वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्रावण महाराज अहिरे अध्यक्षस्थानी होते.यावेळी महामंडलेश्वर डॉ रामकृष्ण लहवीतकर,वारकरी महामंडळ राज्यध्यक्ष आर के रांजणे,राज्य सचिव प्रभाकर महाराज फुलसुंदर,जालिंदर काळोखे,मार्गदर्शक पंडित महाराज कोल्हे,जिल्हाध्यक्ष श्रावणमहाराज अहिरे,सचिव लहू महाराज अहिरे,आमदार दिलीप बनकर,माजी.जिप.अध्यक्ष पंढरीनाथ थोरे,कृष्णा माऊली,वारकरी महामंडळाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे,शंकरराव कोल्हे,बाळकृष्ण ठोके,निफाड तालुकाध्यक्ष हरीचंद्र भवर,विश्वनाथ वाघ,काशीनाथ व्यवहारे,मधुकर ठोंबरे,भरत मिटके(नाशिक तालुका अध्यक्ष),वारकरी महामंडळाचे युवा जिल्हाध्यक्ष हभप संदीप महाराज खकाळे,हभप साहेबराव अनवट यासह वारकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
यावेळी निफाड तालुक्याचे भव्य वारकरी भवन व्हावे यासाठी निश्चय करण्यात आला.तसेच यावेळी डॉ.लहवीतकर महाराज यांनी वारकरी महामंडळ हीच एकमेव अधिकृत संघटना असल्याचे सांगितले,तसेच हभप.अहिरे यांनी सांगितले की,नाशिकच्या धर्मदाय आयुक्त कार्यालयात रखडलेली संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान विश्वस्त निवडीची प्रक्रिया तातडीने करावी,तसेच निवडीच्या अटी शर्तीनुसार कर्तृत्ववान वारकरी विश्वस्त व्हावे,जिल्हा दातृत्ववान आहे,संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर भव्य होईल,असे त्यांनी सांगितले.
यावेळी निफाड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच जिल्हा वारकरी महामंडळचे जिल्हा संघटक म्हणून प्रशांत भरवीरकर यांची तर जिल्हा प्रचार-प्रसार प्रमुख म्हणून राम खुर्दळ यांची नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.