Home विदर्भ “परमपुज्य गुरुदेव बाबुलालजी म. सा. यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

“परमपुज्य गुरुदेव बाबुलालजी म. सा. यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

440

यवतमाळ ः तपो विभोती परमपुज्य गुरुदेव बाबुलालजी म. सा. यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त जैनाचार्य श्री गणेश पौषध शाळा विदर्भ हाऊसिंग सोसायटी यवतमाळच्या वतीने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये दि. 23 ऑक्टोंबर रोजी सामुहिक सामायिक दिवस निमित्त जैन बांधवांनी सामायीक करुन सामायिक दिन साजरा केला. तर 24 ऑक्टोंबर रोजी सकाळी 5.30 वाजता पासून एक दिवसीय अखंड जाप चे आयोजन करण्यात आले तर गुरुदेव बाबुलालजी म. सा. यांच्या प्रथम पुण्यतिथी दिनी म्हणजेच 25 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 ते 12 गुरु गुणानुवाद सभेचे आयोजन जैनाचार्य श्री गणेश पौषध शाळा विदर्भ हाऊसिंग सोसायटी यवतमाळ येथे करण्यात आले आहे तर सायंकाळी मुंबई येथील सुप्रसिद्ध गायक अभिषेकजी परमार यांच्या भक्ती गीताचा (किर्तनाचा) कार्यक्रम सायंकाळी 6.30 ते रात्री 10 पर्यंत विदर्भ हाऊसिंग सोसायटी पाण्याच्या टाकी जवळ अशोक कुमार पुनमिया यांच्या वतीने करण्यात आला आहे. याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.”