लस घेणे अत्यावश्यक आहे अन्यथा नाईलाजाने दुकाने बंद.
मजहर शेख, नांदेड
नांदेड/किनवट : सारखणी येथे सोमवार (दि.२५ ) आज रोजी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार, यांनी बाजारपेठेतील अनेक दुकानात जाऊन कोरोना लस घेतली काय ? याची विचारणा केली व प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहन केले.
किनवट तालुक्यातील सारखणी गाव हे लसीकरणाच्या टक्केवारीत जिल्ह्यात सर्वात कमी असल्याने लसीकरण मोहीमेची पाहणी करण्यासाठी ते सारखणी येथे आले होते.
सर्वप्रथम सारखणी येथील लसीकरण शिबिरास भेट दिली आणि लसीकरणाची माहिती घेतली. कमी टक्केवारी का आहे ? याविषयी संबंधित कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. या प्रसंगी ग्रामसेवक संतोष ताडेवार ,सरपंच सौ वनमाला तोडसाम, तलाठी कदम,जिल्हा परिषद सदस्य विशाल जाधव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कुंदन पवार,आरोग्य सेविका श्रीमती कमटलवार ,यशोदा मडावी आणी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर, आदींची उपस्थिती होती.
त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार, यांनी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कुंदन पवार यांची भेट घेऊन त्यांना सांगितले की, सर्व दुकानदार व नोकर यांनी करण्याची कारवाई करावी लागेल. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरल्याने सर्वजण अवाक झाले होते. त्यांनी केलेल्या आवाहनामुळे लस घेण्यास प्रवृत्त होऊन अनेकांची पावले लसीकरण केंद्राकडे वळल्याचे आशादायी चित्र दिसू लागले.