Home मुंबई तुर्भे एमआयडीसी पोलीस हद्दीत माफिया श्याम हुलिया, हरविंदर, राजेश,लंबू,गुलाब यांचे ऑईल चोरी...

तुर्भे एमआयडीसी पोलीस हद्दीत माफिया श्याम हुलिया, हरविंदर, राजेश,लंबू,गुलाब यांचे ऑईल चोरी चा धंदा जोमात…

551

नवीमुंबई   – तुर्भे एमआयडीसी पोलीस हद्दीत ऑईल भेसळ माफिया श्याम हुलिया, हरविंदर, राजेश,लंबू,गुलाब नामक व्यक्ती व त्याचे काही सहकारी खाजगी व शासकीय मालकीचे एलओडी ऑईल, फरनेस ऑईल, सोपीओ,सोया कच्चा तेल,सनफ्लावर कच्चा ऑईल, आरबीडी पक्का व जाडा(पाम तेल),फेटी कच्चा,डिझेल,पेट्रोल , डांबर,केरोसीन,विविध द्रव्यरूप घातक केमिकल्स आदींची रोज मध्यरात्री ते पहाटेपर्यंत टँकर,बुलेट टँकर वाहनच्या चालक व मदतनीस यांना काही पैश्यांचे आमिषे देवून जडवाहनातील काही प्रमाणात मालाची हेराफेरी (फाळका) चोरी दाखलेबाज गुन्हेगार असलेले माफिया करीत आहे.

 

अवैध धंद्याचे अड्डे पुढील प्रमाणे असे आहेत

१).तुर्भे एमआयडीसी मधील कुकशेत गाव,टी.टी.सी.इंडस्ट्रियल इस्टेट ,एस सेंट्रल रोडवरील एचपीसीएल वाशी टर्मिनल कंपनीच्या समोरील उंचवटयावर असलेल्या डांबरी रस्त्याने पुढे जाताना हिंदुस्तान कोलास प्रा.ली.कंपनी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वर टैंकर ,बुलेट टैंकर पार्किंग करीत त्याच्या आड वरील प्रमाणे असलेल्या नमूद मालाची चोरी करण्यात येत आहे.

२).तुर्भे एमआयडीसी मधील कुकशेत गाव,टी.टी.सी.इंडस्ट्रियल इस्टेट ,एस सेंट्रल रोडवरील विशाल रेस्टोरेंट अँड बार च्या आजुबाजुच्या रस्त्याच्या दुतर्फा वर टैंकर ,बुलेट टैंकर पार्किंग करीत त्याच्या आड वरील प्रमाणे असलेल्या नमूद मालाची चोरी करण्यात येत आहे.त्याचप्रमाणे विशाल रेस्टोरेंट अँड बार च्या समोरील मातीच्या कच्च्या रस्ता असून त्या रस्त्याच्या डावी कडील बाजूस लोखंडी शटर बसविलेले गोडावुन भाडे तत्वावर घेऊन त्यात चोरीचा माल लपवून बोगस बेल्टी चलना द्वारे विक्री करण्यात येत असते.

येथे कायदा-सुव्यवस्थेला बटीक बनविण्यात आलेले असून चोरी करतेवेळी माफियांची टोळी रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनावर पाळत ठेवण्यासाठी आणि अवैध धंद्यावर टँकर,बुलेट टँकर मधून माल काढताना चोरी उघडकीस येवू नये यासाठी रस्त्यावर सदोदित चार मोटारसायकल, दोन चारचाकी वाहने यांचा येणे-जाणे सुरू असते. चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक
पोलीस प्रशासन, जिल्हा नागरी पुरवठा अधिकारी आणि जिल्हा अन्न व औषध आयुक्त यांच्या यांचे मदत,प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि संरक्षण प्राप्त आहे का असा सवाल नवीमुंबईकर करू लागले आहेत.
ऑईल माफिया श्याम हुलिया, हरविंदर, राजेश,लंबू,गुलाब आणि त्याचे सहकारी रोज सकाळ ते रात्रभर आणि पहाटेपर्यंत चोरण्यात आलेला नमूद प्रमाणे माल त्यांच्या जवळील असलेला इचर व आयशर टेम्पो व लहान टेम्पो या वाहनात लागलीच प्लास्टिक व लोखंडी बॅरेलात मोटार पंपाद्वारे भरण्यात येऊन मध्ये नियोजित स्थळी असलेल्या गोडावून मध्ये लपविण्यात येते.त्यांच्या जवळील असलेल्या अधिकृत परवाना च्या बोगस ,बनावट बेल्टी चलनाद्वारे बाजारभावापेक्षा कमीदराने चोरण्यात आलेला माल व्यावसायिकांना विकण्यात येतो.अशाप्रमाणे कोट्यावधी रुपयांची काळी कमाई हेराफेरीतून मिळवून केंद्र सरकार ,राज्य सरकार आणि महानगरपालिकाचा विविध प्रकारचा कर महसूल बुडविण्यात येत आहे.