◆तीन कोटी ४२ लाख १७ हजार ७०० रुपयांचे ६ किलो नऊशे ग्राम सोने जप्त
◆नऊ लाख ५० हजार रुपयाची रोख रक्कम केली जप्त
◆१४ लाख ३७ हजार ९६० रुपयांसह तिसरा आरोपी फरार
जालना- लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बनच्या शाखेत दरोडा टाकून कोट्यावधी रुपयांचा ऐवज लांबवणार्या तीन बंदूकधारी दरोडेखोरांपैकी दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह गेवराई पोलिसांना यश आले आहे.गेवराई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी गेवराई तालुक्यातील पांढरवाडी फाटा येथून एका दरोडेखोराला तर गेवराई शहरातील संजयनगर परिसरातून दुसऱ्यास अटक केली. दोन्ही आरोपींना शनिवारी सकाळी गोंदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दोन दिवसापूर्वी शहागड येथील बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव सोसायटीत झालेल्या सशस्त्र दरोड्यातील बँकेतील अगदी २३ लाख ८७ हजार ९६० रुपये व तीन कोटी ४२ लाख १७ हजार ७११ रुपयांचे कर्जदाराचे बँकेत कारण असलेले सोने या दरोडेखोरांनी लुटून नेले होते.तीन दरोडेखोर पैकी दोघांना अटक करण्यात गेवराई व जालना पोलिसांना यश मिळाले आहे.
या गुन्ह्यातील आरोपीनी कर्जबाजारीपणामुळे व सावकारी देणे फेडण्यासाठी बँकेवर दरोडा टाकला होता.यातील आरोपी मुकिम उर्फ मुस्ताफ कासम राहणार गेवराई जिल्हा बीड व त्याचा दुसरा साथीदार संदीप बबन सोळंके राहणार माजलगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील तीन कोटी ४२ लाख १७ हजार ७०० रुपयांचे संपूर्ण ६ किलो नऊशे ग्राम सोने आणि नऊ लाख ५० हजार रुपयाची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केले आहेत. उर्वरित १४ लाख ३७ हजार ९६० रुपयांसह तिसरा आरोपी फरार असून त्यास लवकर ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिले
या दरोड्याच्या घटनेमुळे जिल्हा पोलिस प्रशासनासह राज्यातील पोलीस दल हादरून गेले होते.काल औरंगाबाद विभागाचे आयजी मालिकार्जुन प्रसन्ना यांनी शहागड येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली होती.यावेळी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील,पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ,एपीआय दीपक लंके,गजानन कौलासे आदींची उपस्थिती होती. दरोड्याचा अवघ्या ३६ तासात छडा लावल्यामुळे जालना पोलीस दलाचे व गेवराई पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे
चौकट-१)
ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दलाचे जास्तीत जास्त बळकटीकरण करण्यात येणार आहे. तसेच या ग्राम सुरक्षा दलाला आवश्यक असणारे साहित्य देण्यात येणार आहे.
२) बँकेतील कर्मचाऱ्यांची या प्रकरणात काही लागे बांधे आहेत का याचा सुद्धा तपास करण्यात येणार आहे.
३)बँक सुरक्षे मध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी दिसून येत आहे याची योग्य खबरदारी बँक प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. या त्रुटींमुळे अश्या प्रकारचे गुन्हे घडत असतात.