३० खाटांचे सर्वात मोठे ग्रामीण रुग्णाल फक्त नावालाच सुविधा नाही गावाला…!
(रवि जाधव )
देऊळगाव राजा:-सोनोग्राफी या अत्याधुनिक सयंत्राचा जास्त उपयोग गरोदर आणि स्तनदा माता आरोग्य तपासणी करीता करतात.परंतु सोनोग्राफी सेंटर हे जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळे गोरगरीब महिलांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते त्यातच गरोदर महिलांना दिवस भर सेंटरच्या ठिकाणी जाऊन बसावे लागते.त्यामुळे देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर सुरू करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे गोरगरीब महिला वर्गांना उपचार घेण्यासाठी जवळच्या सरकारी दवाखान्यात जावे लागते पण सोनोग्राफी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी महिलांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. एकीकडे महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून गोरगरीब महिलांना मोफत व तात्काळ उपचारासाठी विविध प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिला आहे.मात्र देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर व तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे या भागातील गरोदर स्तनदा मातांना उपचारासाठी बुलढाणा, दुसरबीड,देऊळगाव राजा ठिकाणी जाऊन उपचार घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांना नाहकच त्रास सहन करावा लागत आहे.तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी सोनोग्राफी सेंटरवर रंगाच्या रांगा असल्याने खेड्यावरून प्रवासाचे धक्के खात गेलेल्या महिलांना रांगेत उभे राहून अडचणींच्या सामना करावा लागतो.त्यातच कोरोनाची महामारी जिल्ह्याच्या ठिकाणी पाहिजे तसी व्यवस्था होत नसल्याने या गोरगरीब स्तनदा व गरोदर मातांना आर्थिक भुर्दंड सहन करीत खाजगी दवाखान्यात जावून सोनोग्राफी करावी लागते.अशी महिलांची गैरसोय थांबविण्यासाठी आरोग्य विभागाने ग्रामीण रुग्णाल देऊळगाव मही येथे सोनोग्राफी सेंटर व तज्ज्ञ डॉक्टर दिल्यास महिलांची हेडसाळ व गैरसोय होणार नाही त्यामुळे तात्काळ ग्रामीण रुग्णालयात देऊळगाव मही येथे सोनोग्राफी सेंटर व तज्ज्ञ डॉक्टर द्यावा अशी मागणी होत आहे.