Home विदर्भ पाळोदी येथे बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथाची सांगता.

पाळोदी येथे बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथाची सांगता.

444

यवतमाळ / दारव्हा (प्रतिनिधी):- तालुक्यातील पाळोदी येथील पंचशील मंडळाच्या वतीने बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाच्या सांगता समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारव्हा दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव मोहोड (सामाजिक कार्यकर्ते),भगवान मुधाने (गायक), दिंगाबर मोहाडे,दीपक नवरंगे(ग्रा.प.सदस्य पाळोदी ) इंजी.कुशल शंभरकर, मुकिंदराव मनवर विचार मंचावर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रथम धम्म ध्वजाचे ध्वजारोहन मुकिंदराव मनवर यांच्या हस्ते करण्यात आले.तर तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे पुष्पाने पूजन वसंतराव मोहोड यांनी तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन पुष्प माला अर्पण करून बिमोद मुधाने यांनी केले तर म. ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्या चे पूजन पुष्पमाला अर्पण करून दिंगाबर मोहाडे यांनी केले.यावेळी सामूहिक त्रिशरणं पंचशील घेवून विचार मंचावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत ठाणे यांनी केले.तसेच ग्रंथवाचक मधुकरराव तलवारे यांचा सहपत्निक कपडे व साडी चोडी देवून मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.तर यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर तलवारे यांनी केले तर ते बोलतांना म्हणाले की,नारायण नगराळे,रामरावजी डेरे,विश्वनाथ डोंगरदिवे हे जुने कार्यकर्ते जरी आज हयात नसले तरी मात्र त्यांना विसरता येत नाही.कारण त्यांच्याच तालमीत आम्ही ही तयार झाले आहोत. तसेच हयात असलेले हरिभाऊ इंगोले यांचाही आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही कार्य करीत आहो…. तर कार्यक्रमाच्या संदर्भात ही आपले मत मांडले.तसेच मुकिंदराव मनवर यांनी वर्षावासा बद्दल माहिती दिली तर ते पुढे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की, धम्माचा गाढा मी इथं वर आणला आहे तो पुढे नेता आला तर न्या परंतु मागे मात्र खेचू नका.तर वसंतराव मोहोड यांनी बोलतांना सांगितले की, बाबासाहेबांचे स्वप्न होते की, मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन परंतु त्यांना १४ आॅक्टोबर नंतर त्यांच्या कडे जास्त वेळ मिळाला नाही परंतु त्यांनी भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून संपूर्ण भारत बौद्धमय केला.पुढे म्हणाले की, चातुर्वर्ण्य व्यवस्थेने शूद्र अतिशूद्र व सर्व जातीतील स्त्रियांना हक्क अधिकार नाकारले होते परंतु ते संविधानाच्या माध्यमातून पुन्हा बाबासाहेबांनी मिळवून दिले….
रक्षाबंधनाला येणारा भाऊ स्त्रियांना माहीत आहे परंतु खरी रक्षा संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी संपूर्ण स्त्रियांची केली हे मात्र कोणत्याही स्त्रीला माहित नाही ही मात्र खेदाची बाब आहे. दिंगाबर मोहाडे यांनी बोलतांना सांगितले की, बाबासाहेब असं म्हणतात की,माझा जन्म मनुष्यमात्राला हानिकारक असणाऱ्या जुन्या धर्मात झाला होता ते मी नाकारू शकत नाही.व जन्म घेणे माझ्या हातात नव्हते.परंतु मी त्या धर्मात मरणार नाही.अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती.. तसेच पुढे ते म्हणाले की,आज दारव्हा तालुक्यात तसेच परिसरात बहुजन समाज हिताचे काम करतांना बिमोद मुधाने व त्यांची बहुजन मुक्ती पार्टी यांच्या व्यतिरिक्त मला कुणीही दिसत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात बहुजन समाजाने त्यांना मदत करावी असेही त्यांनी सांगितले…. इंजी.कुशल शंभरकर यांनी बोलतांना सांगितले की,अनेक जण असे म्हणतात ग्रंथाची समाप्ती आहे.ग्रंथ कसा काय संपू शकतो.ग्रंथ संपला नाही तर ग्रंथाचे वाचन संपले असे आपण म्हणू शकतो.एक ग्रंथ संपला म्हणजे दुसरा ग्रंथ आपण वाचू शकत नाही?बुद्ध आणि त्यांचा धम्म हा एकच ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला नाही तर हजारो ग्रंथ लिहलेले आहे त्यापैकी हा एक ग्रंथ आहे परंतु आम्ही बाराही महिने ग्रंथ वाचू शकतो.विविध चर्चा सत्र,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घेऊ शकतो.आधीच्या काळात विहारे ही ज्ञानदानाची केंद्रे होती.आता मात्र तसे दिसून येत नाही…. शेवटी बिमोद मुधाने यांनी अध्यक्षीय भाषणात बोलतांना सांगितले की, “अब भाषण की नहीं राशन की बात होनी चाहिए!” कारण वर्तमान परिस्थिती ही मागील एकोनविससे छप्पनच्या काळा सारखीच दिसून येत आहे.त्याकाळात सुद्धा बोलण्याची बंदी होती आजही तीच परिस्थिती आहे काल तोंडाला गाडगे होते.आज तोंडाला मुस्के (मास्क)लावून बोलण्याची बंदी केली आहे.हक्क अधिकार नाकारले जात आहे..परंतु पाहिजे त्याप्रमाणात मोर्चे आंदोलने करतांना कुणीही दिसत नाही… आज नव तरुणांनी पुढाकार घेऊन धम्म कार्याची धुरा सांभाळली पाहिजे परंतु तसे होतांना दिसत नाही.ही मात्र खेदाची बाब आहे.तसेच बहुजन समाजातील संत महापुरुषांचे आंदोलन सुद्धा भक्तीचे आंदोलन नसून ते भट मुक्तीचे आंदोलन होते.भक्तीचे आंदोलन असते तर त्यांच्या हत्या झाल्या नसत्या इतिहासात पुरावे आजही मिळतात….बाबासाहेब आणि रत्तू यांच्यातील संवादामध्ये बाबासाहेब रत्तुला म्हणतात की, रत्तु मी धम्माचा गाडा खूप महत प्रयासाने इथवर आणलेला आहे परंतु मला हा धम्माचा गाडा पुढे नेणारा एकही नवतरुण दिसत नाही मी काय करू….त्यावेळी बाबासाहेब ढसा ढसा रडतात… काय आज ही ती परिस्थीती बदलली आहे असे वाटते? आज ही अनेक जण साडी, माडी,गाडी मध्येच अडकून पडले आहेत.कुणालाही धम्म कार्यासाठी वेळ मिळत नाही. (काही अपवाद वगळता)म्हणून नवतरूणांनी धम्म कार्यात सहभागी होऊन धम्म रथाचे चाक होऊन धम्म चक्र गतिमान करावे.असे प्रतिपादन मा.बिमोद विठ्ठलराव मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारव्हा दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ सांगता समारोह विचार मंचावरून केले.
बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ सांगता समारोहासाठी पाळोदी येथील पंचशील मंडळाचे अध्यक्ष (चंद्रकांत डेरे)तसेच उपाध्यक्ष,सचिव,सर्व सदस्य तसेच रमाई महिला मंडळ अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव सर्व सदस्य यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.