ऐन दिवाळीतच कुटुंबियांवर कोसळले संकट
अमीन शाह ,
बुलढाणा प्रतिनिधी , संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा येथील एका घरात रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला . हा स्फोट एवढा भीषण होता की घरावरील छप्पर उडाले . यात घरातील चारजण गंभीर जखमी झाले आहेत . काकनवाडा गावातील रात्री २ वाजता घरगुती सिलिंडरच्या स्फोटात घरावरील पत्राच उडाला . या घराचे मोठे नुकसान झाले आहे . या स्फोटात श्रीकृष्ण उगले , गोपाळ उगले , रवी इप्परकर , राहुल इप्परकर हे चौघे जखमी झाले आहेत . या सर्व जखमींना तातडीने संग्रामपूर येथील रुग्णालयात दाखल केले . सर्वांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना अकोला येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे . दिवाळी सणाच्या पुर्वी घरावरील छप्पर उडाल्याने कुटुंब भयभीत झाले आहे .