Home महत्वाची बातमी वाह रे आई पोटच्या सख्ख्या मुलींवरच करु दिला अत्याचार ,

वाह रे आई पोटच्या सख्ख्या मुलींवरच करु दिला अत्याचार ,

867

 

 

आई बाप व शेजाऱ्यास अटक ,

अमीन शाह
औरंगाबादः अल्पवयीन मुलीवर सावत्र बाप गेल्या वर्षभरापासून लैंगिक छळ करत असल्याची घटना वैजापूरमध्ये उघडकीस आली आहे. या बापासह आणखी एक जण मुलीवर अत्याचार करत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली असून या सगळ्या भयंकर प्रकारासाठी मुलीच्या आईचीही सहमती असल्याचे समोर आले आहे. या सावत्र बापासह अन्य एकजण आणि आई या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित अल्पवयीन मुलगी 14 वर्षीय असून ती औरंगाबाद येथील एका वसतिगृहात शिक्षण घेत होती. परंतु तिच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे ती शहरातील मोंढा मार्केट परिसरातील तिच्या आईकडे राहण्यासाठी आली होती. ती गेल्या वर्षभरापासून येथे वास्तव्यास होती. परंतु सावत्र बापाची या मुलीवर वाईट नजर होती. तो तिच्यासोबत वारंवार अश्लील चाळे करत होता. एवढेच नव्हे तर शेजारी राहणारा आणखी एक जणही तिचा लैंगिक छळ करत होता.

वाह रे आई ,

शेजारी आणि सावत्र बापाचे हे कृत्य मुलीने आईच्या कानावर घातले तेव्हा आईने मुलीची साथ न देता शेजारी जसे सांगतो, तसे कर असे सांगितले. तसेच पीडित मुलीला मारहाण केली

अत्याचार ,

मुलीवर सतत अत्याचार करणाऱ्या या दोघांनी वर्षभरापासून तिचा छळ केला. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर गेल्या आठवड्यात 24 ऑक्टोबर रोजी बापाने मुलीच्या गुप्तांगात मिरची पूड टाकून क्रौर्याची सीमा गाठली. त्रास होऊ लागल्यावर मुलगी शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील तिच्या मावशीकडे पळून गेली. ती मावशीकडे गेल्यानंतर धमक्या देण्यासाठी इतरांना पाठवले गेले. पण मावशीने त्यांना पिटाळून लावत थेट वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. हा घृणास्पद प्रकार ऐकून पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली. या पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सावत्र बापासह आई व अन्य एकजण अशा तिघांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.