जलगाँव: (एजाज़ गुलाब शाह)
जागतिक संघटना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या वतीने 31ऑक्टोबर रोजी ए आय एम ए खान्देश गौरव पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या वतीने जळगाव येथे पालक मंत्री व पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री ना..श्री गुलाबराव पाटील साहेब , माजी मंत्री गुलाबराव देवकरसाहेब, खासदार उमेश दादा पाटील, महापौर सौ जयश्रीताई महाजन, यांच्या हस्ते वैद्यकीय शास्त्रातील चिकित्सकांचा योगदानाची दखल घेत ए आय एम ए खान्देश गौरव पुरस्कार देऊन सम्मान करण्यात आला.
संघटनेचे व्हाईस चेअरमन संपूर्ण भारतात सात चिकित्साला एकत्र घेऊन येणारे आणि ज्यांचामुळे हे संघटन उभे आहे असे डॉ. नितीन पाटील संघटनेचे अध्यक्ष डॉ सतीश कराळे, राष्ट्रीय प्रवक्ते तुषार वाघुळदे तसेच हा कार्यक्रम खान्देशमध्ये घडवून आणणारे सुवर्ण पुनर्वसु आयुर्वेदचे संचालक डॉ. राकेश झोपे,
आयुर्वेद तज्ञ डॉ कृष्णमुरारी शर्मा,डॉ हर्षल बोरोले,युनानी अध्यक्ष डॉ मोहम्मद बेग, होमिओपॅथी उपाध्यक्ष डॉ राजेंद्र पडोळ, होमिओपॅथी महिला अध्यक्ष डॉ आशा भोसले,
एक्युपंक्चर उपाध्यक्ष डॉ लिना बोरोले, नेचरोपेथी अध्यक्ष डॉ केदार कुलकर्णी, प्रवक्ता तुषार वाघुळदे, वीरेंद्र गिरासे व राज्यातील अनेक पदाधिकारी या सोहळाला उपस्थित होते खान्देशातील डॉ. नदीम नजर यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ. नदीम नजर यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व मित्रपरिवार कडून शुभेच्छाची वर्षाव होत
कौतुक होत आहे.