Home बुलडाणा कृषी पंपाचा रात्रीचा वीज पुरवठा बनला शेतकरी वर्गाची डोखेदुखी

कृषी पंपाचा रात्रीचा वीज पुरवठा बनला शेतकरी वर्गाची डोखेदुखी

335

प्रतिनिधी:-रवि जाधव
देऊळगाव मही:-पाडळी शिंदे परिसरातील शेतकरी वर्गांना कृषी पंपाचा वीज पुरवठा देऊळगाव मही सब स्टेशन वरून होत असून या सब स्टेशन अंतर्गत तीन फिटर असून त्यात देऊळगाव मही टाकरखेड व डीग्रस असे तीन गावठाण व तीन कृषी पंप फिटर आहे गेल्या कित्येक वर्षांपासून डीग्रस कृषी पंपाचा वीज पुरवठा हा नियमितपणे सकाळी सहा ते दोन या वेळेत होत असे व यावर्षी देऊळगाव मही सब स्टेशन कडून एक आठवडा दिवसा व एक आठवडा रात्री त्यात बारा पंचेचाळीस ते सकाळी आठ पंचेचाळीस वीज पुरवठा देण्यात येत असल्याने शेतकरी आगोदरच सततच्या पावसाने खरीप हंगाम हातचा गेल्याने मेटाकुटीला आला असून सद्य स्थितीत मुबलक प्रमाणात रब्बी हंगामात तूर हरबरा ज्वारी गहू या पिकांना देण्यासाठी पाणी असून रात्रीच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा या मुळे शेतकरी त्रस्त झाले असून महावितरण चे कर्मचारी यांना शेतातील वीज पुरवठा जुन्या वेळे वीज पुरवठा सोडण्याची मागणी करीत असून त्यांच्या कडून कृषी पपं वीज पुरवठा टाईम हा वरिष्ठ कार्यालय यांच्या कडून आल्याचे सांगण्यात येत असून रात्री च्या शेतातील वीज पुरवठा शेतकरी वर्गांची एन थंडीच्या दिवाळीच्या सणाच्या दिवसात शेतकरी शेतातील पिके यांना पाणी देण्यासाठी रात्रीचा दिवस करताना दिसत असून लोकप्रतिनिधी यांनी याकडे पुर्णतः दुर्लक्ष केले आहे तसेच काही गावांना गावठाण वर कृषी पपं जोडलेले असून अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे एवढे मात्र खरे!

“देऊळगाव मही सब स्टेशन कडून शेतातील वीज पुरवठा सात वर्षे पासून सकाळी ६ते २ या वेळेप्रमाणे डीग्रस कृषी पंपाचा वीज पुरवठा द्यावा
विठ्ठलराव रुस्तुमराव शिंदे
शेतकरी पाडळी शिंदे”.