Home विदर्भ घाटंजी पंचायत समितीच्या सभापती निता जाधवसह सदस्या विरुध्द अपात्रता प्रकरणी जिल्हाधिकारी न्यायालयात...

घाटंजी पंचायत समितीच्या सभापती निता जाधवसह सदस्या विरुध्द अपात्रता प्रकरणी जिल्हाधिकारी न्यायालयात युक्तिवाद पुर्ण..!

468

➡️ नियमानुसार 90 दिवसांत निकाल देने बंधनकारक..?

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी (यवतमाळ) – घाटंजी पंचायत समितीच्या सभापती निता आकाश जाधव, सदस्या कालींदा रणधीर आत्राम यांना अपात्र करण्यासाठी महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य सभासद अनहर्ता कायदा 1986 व नियम 1987 अंतर्गत उत्तरवादी पंचायत समिती सभापती निता जाधव, सदस्या कालींदा आत्राम यांनी कायद्याचा कलम 3 प्रमाणे अपात्रता अर्जित केलेली असल्याने त्या दोघांचे सदस्यत्व नियम 6 प्रमाणे रद्द करण्याची मागणी, घाटंजी पंचायत समितीचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व भाजपा गट नेते अभिषेक शंकरराव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात केली आहे. विशेष म्हणजे सदर प्रकरणात नियमानुसार 90 दिवसांत आदेश पारित करणे महत्त्वाचे असतांना जवळपास दोन वर्ष लोटुनही आदेश पारित झाला नसल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे 4 आँक्टोंबर रोजी दोन्ही वकीलांचा युक्तिवाद पुर्ण झाला असून याचीकाकर्ता अभिषेक ठाकरे यांची बाजू अँड. रविशेखर बदनोरे यांनी न्यायालयात मांडली. ➡️ घाटंजी पंचायत समिती अंतर्गत एकून सहा पंचायत समिती सदस्य आहे. त्यात भारतीय जनता पार्टीचे 4 सदस्य, शिवसेना 1 सदस्य व अपक्ष 1 असे पंचायत समिती सदस्य आहे. विशेषतः घाटंजी पंचायत समिती अंतर्गत सभापती, उप सभापती यांची निवडणूक 8 जानेवारी 2020 रोजी असल्याने अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार पुजा माटोडे यांनी 27 डिसेंबर 2019 रोजी पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना नोटीस बजावली होती. भारतीय जनता पार्टीकडे चार पंचायत समिती सदस्य असल्याने बहुमत होते. त्यामुळे 4 जानेवारी 2020 रोजी भाजपा पंचायत समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली. मात्र, या बैठकीला भाजपाचे पंचायत समिती सदस्य व सद्याचे सभापती निता आकाश जाधव व सदस्या कालींदा रणधीर आत्राम हे दोन सदस्य गैरहजर होते. या बैठकीत पंचायत समिती सभापती पदी नयना जिवन मुद्देलवार यांचे नांव सुचित करण्यात आले. तर उप सभापती पदी कालींदा रणधीर आत्राम हिचे नांव सुचित करण्यात आले होते. सभापती व उप सभापती यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गट नेता अभिषेक ठाकरे यांनी 7 जानेवारी 2020 रोजी पक्षादेश (व्हिप) जारी केला होता. तसेच भाजपा पंचायत समिती सदस्यांना पक्षादेश (व्हिप) बजावण्यासाठी भाजपाचे घाटंजी तालुकाध्यक्ष गुड्डू उर्फ राजु शुक्ला, भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आशीष सुरेशबाबू लोणकर व पंचायत समिती सदस्य तथा भाजपा गट नेता अभिषेक शंकरराव ठाकरे हे निता आकाश, कालींदा आत्राम ह्यांचे घरी गेले असता ते दोघेही सदस्य हे घरी नसल्याने त्यांनी भ्रमणध्वनी केला. मात्र, त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने त्यांनी भाजपाचे पक्षादेश (व्हिप) कुटुंबियांना देण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुटुबियांनी पक्षादेश घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्या घराच्या भिंतीला नोटीस लाउन त्याचा पंचनामा करून फोटो वगैरे काढुन घेतले. 8 जानेवारी 2020 रोजी घाटंजी पंचायत समितीच्या सभापती, उप सभापतीची निवडणुक असल्याने विशेष सभेत भाजपा पंचायत समिती सदस्य निता आकाश जाधव यांनी सभापती करीता अर्ज दाखल केला. तर उप सभापती करिता शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य सुहास सुभाषचंद्र देशमुख पारवेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे उत्तरवादी भाजपाचे पंचायत समिती सदस्य व सद्याचे पंचायत समिती सभापती निता आकाश जाधव व सदस्या कालींदा रणधीर आत्राम यांनी पक्षादेशाचा अनादर केल्याने त्यांना महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था पक्षांतर विरोधी कायदा 1986 चे कलम 3 प्रमाणे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी, भाजपा गट नेता अभिषेक ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात केली आहे. याचीकाकर्ता अभिषेक ठाकरे यांची बाजू अँड. रविशेखर बदनोरे यांनी मांडली. एकंदरीत दोन्ही भाजपा सदस्यांच्या अपात्र करण्याच्या निर्णयाला जिल्हाधिकारी न्यायालयात काय निर्णय लागतो या कडे घाटंजी तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे, हे विशेष.