Home साहित्य जगत सडके राजकारण , ???

सडके राजकारण , ???

172

!! सडके राजकारण !!

सडके राजकारण तर असेच असते राव !
ठरवी एकाला चोर तर दुसऱ्याला साव !!
प्रथम त्याला पुढे करत घालायचा घाव !
पुन्हा स्मर्थणार्थ करायाची धावाधाव !!

सडके राजकारण तर असेच असते राव,,,!

चाले एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांचा डाव !
निवडणूकीत जातीय समीकरणाला भाव !!
कोणाची कोणती जात,कोणाचे कोणते गांव !
ही राजकिय जुगलबंदी ना कुणा कळे राव !!

सडके राजकारण तर असेच असते राव,,,!

भ्रष्टाचार आणी लाचखोरीची खावाखाव !
यांचेच भ्रष्ट नेते आणि अधिकारी नांव !
सर्वसामान्यांना जेथे कवडीमोल भाव !
जो असे पक्का चोर,भ्रष्ट तोच ठरे साव !!

सडके राजकारण तर असेच असते राव !
ठरवी एकाला चोर तर दुसऱ्याला साव !!

शौकतभाई शेख – श्रीरामपूर
मोबा.नंबर – ९५६११७४१११

————————————–

 जे स्वच्छ आणि पारदर्शी राजकारण करतात त्याच्या राजकारणातून उपेक्षितांना न्याय मिळतो तथा जे कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचारी असतात त्यांच्या सेवेतून उपेक्षितांची कामे होतात,मात्र जे भ्रष्ट आणि लाचखोर नेते आणि अधिकारी असतात जे सामाजाला घातक असे सडके राजकारण करतात त्यांच्या बाबतीत वरील कवितेचे शब्द आहेत, करीता स्वच्छ आणि पारदर्शी कारभार असलेल्यांनी वाईट वाटून घेऊ नये ही विनंती 🙏)