Home विदर्भ बळीराजाचा न्याय समाजापुढे येणे गरजेचे – प्रा. तोष्णाताई मोकडे

बळीराजाचा न्याय समाजापुढे येणे गरजेचे – प्रा. तोष्णाताई मोकडे

115

यवतमाळ प्रतिनिधी
समाजामध्ये सांस्कृतिक परिवर्तन घडून यावे, स्वातंत्र्य समता बंधुता न्याय प्रजेला मिळावा ही बळीराजाची शिकवण, त्यांचा खरा इतिहास समाजापुढे यावा म्हणून सत्यशोधक महिला व अध्यापक विचार मंच ,भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन ,ओबीसी जनमोर्चा यांच्या वतीने दिनांक 5 नोव्हेंबर रोजी ज्योती सावित्री विहार, महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक विद्यापीठ, मोहा फाटा ,धामणगाव रोड यवतमाळ. येथे बळीराजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले .


कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. तोष्णाताई मोकडे यांनी आपल्या मार्गदर्शनात बळीराजाचा संघर्ष हा सूर आणि असुरांचा होता, वामनाने कपटाने बळीचा अंत केला .परंतु त्यांना बळीराजा संपवता आला नाही .ही भूमिका त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली . मा. नम्रताताई खडसे यांनी बळीराजा आणि आजच्या शेतकऱ्याची झालेली आर्थिक पिळवणूक या बाबत संदर्भ देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ.ज्ञानेश्वर गोरे यांनी आपल्या शिक्षणातून जर बळीराजाच्या इतिहासाची चिकित्सा सुशिक्षित समाजाला करता येत नसेल, तर ते शिक्षण तुम्हाला गुलाम बनवते. त्यामुळे आपण आपल्या विचारांच्या संकल्पना वृद्धिंगत केल्या पाहिजे .आणि फुले-शाहू-आंबेडकरांचे दृष्टी घेऊन आपण आपल्या समाजामध्ये जागृती निर्माण केली पाहिजे असे ते म्हणाले .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून .मा.विकास दरणे ,विद्या खडसे,विलास काळे, ज्योती खेडकर हे मंच्यावर उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सूनिताताई काळे, नीता दरणे,माधुरी फेंडर , अनिता गोरे , कमलताई खंडारे ,माया गोरे , प्रमिला पारधी , अपर्णा लोखंडे ,रेखा कोवे , प्रियाताई गोरे,प्रा. प्रियाताई वाकडे, शुभांगी मालखेडे , सेजल फेंडर, भावना गुल्हाने, रिता ठवकर , दीपा काळे , रेखा मगर, शोभना कोटंबे , लता सोनटक्के, प्रा. सुनंदा वालदे, सुधा वाघमारे, मृणाली दहीकर , यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला भूषण ब्राह्मणे,सुरेश वानखेडे, नारायण नाकतोडे, अभदय गोरे, रवींद्र गुल्हाने, दिपायल मेश्राम, खुशी मेश्राम, महेश मोकडे, स्वप्नील मादेशवार ,प्रमिल मादेशवार, डॉ. सुनंदा वालदे, शर्वरी वालदे, शोभना कोटंबे,आराध्या गुल्हाने ,भावना गुल्हाने, प्रज्वल वालदे, गजानन राऊत, शशिकांत फेंडर , ए.वानरे, विश्वास वालदे, विकास धरणे, विद्या खडसे,ज्योती खेडकर, ज्योती निरपासे, वंदना खडसे ,माणिकराव खडसे ,संध्या फुलकर, प्रमिला साखरकर, रेखा मेश्राम ,कल्याणी मदेशवार ,कमल खंडारे ,लता सोनटक्के, सुधा वाघमारे, प्रा अंकुश वाकडे ,लिलाबाई काळे, नीता धरणे, अनिता गोरे ,भाग्यश्री खाडे, आशाताई ब्राह्मणे ,अर्पणा लोखंडे ,माधुरी फेंडर, विजय मालखेडे ,मीना डांगे ,सुरेश डांगे, सुनंदा कांबळे ,रंजना कांबळे, अमेय गोरे ,अविनाश गोरे ,नितीन पाटील ,राजेश गुल्हाने ,शरयू गुल्हाने, विजया हुडे, सृष्टी हूडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन सुनिता काळे यांनी केले , तर आभार कल्याणी मादेशवार यांनी मानले.