जाहिरात
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
देशाची नवी पिढी व्यसनमुक्त राहावी म्हणून दिवाळीनिमित्त्य एक पणती व्यसनमुक्ती उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा येथील विद्यार्थ्यांनी राबवला आहे.
या उपक्रमाअंतर्गत दिवाळीच्या दिवशी अंगणात,घरासमोर रांगोळी काढून पणती लावून व्यसनविरोधी घोषवाक्य लिहिण्यात आले.
या उपक्रमात बालपरीषदेचे प्रतिक्षा शेंडगे,आरती मोढेकर,कृष्णा मुळक तसेच वेदिका वाकडे,संस्कृती मांगडे,रोहिणी मुळक,ज्ञानेश्वरी घोडके,गायञी घोडके,अमृता गिरी यांनी सहभाग नोंदविला.
या सर्व विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षक श्रीधर यशवंतराव कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.या उपक्रमाचे केंद्रप्रमुख रमेश फटाले,मुख्याध्यापक सुभाष चाटे,सलाम मुंबई फाऊंडेशनचे सतिश वानखेडे,शुभांगी लाड,संजय सर,निर्माण विकास संस्था जालनाचे विजय बनसोडे,अनुप मोरे,सुरेश नंदबन्सी,अर्जुन खोंडे,विठ्ठल वाजे,लहू गोल्हार,ग्रामस्थ पालक यांनी कौतुक केले आहे.