Home बुलडाणा त्रिपुरा येथे मुस्लिम समुदायावर अमानुष अत्याचार करणाऱ्यांवर व हल्ला प्रकरणी कठोर कारवाई...

त्रिपुरा येथे मुस्लिम समुदायावर अमानुष अत्याचार करणाऱ्यांवर व हल्ला प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी ,

374

 

 

अमीन शाह

मुस्लिम सेवा संघ संग्रामपूर यांचे राष्ट्रपतींना निवेदन , 

आज दि 8/11/2021रोजी मुस्लिम सेवा संघ संग्रामपूर तालुक्याच्या च्या वतीने संग्रामपूर तहसिलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपति यांना निवेदन देण्यात आले…

त्रिपुरा येथे मुस्लिम समुदायावर काही समाज कंटकांनी मुस्लिम समुदायाच्या घरांवर हल्ले करुन घरे जाळण्यात आली तसेच मुस्लिम समुदायाचे दुकाने जाळुन नासधुस करुन आर्थिक नुकसान करण्यात आले…तसेच मस्जिदी जाळुन जमिनदोस्त करुन त्या जागेवर विशिष्ट समुदायाचे झेंडे लावण्यात आले ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असुन गैरसंविधानिक आहे…ही घडत असतांना पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत होते म्हणून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून या घटनेला मुकसहमती देणारे पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांवर बडतर्फी ची कारवाई करण्यात यावी. तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी…या घटनेला रोखण्यात अपयशी ठरलेली तिथील राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागु करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली…
निवेदनावर.. मुस्लिम सेवा संघ तालुका अध्यक्ष हमीद पाशा तालुका महासचिव सलीम शेख, तालुका सचिव जुनेद मिर्झा, तालुका उपाध्यक्ष साबीर खान, तालुका उपाध्यक्ष रमीज़ शेख, तालुका संघटक तौसिफ जमदार, तालुका सहसंघटक सैय्यद जाबीर, तालुका सहसचिव फारुक शेख, तालुका कोअर कमेटी वाजीद शेख, तालुका कोअर कमेटी, असिफ शेख, तालुका कोषाध्यक्ष नईम शेख, तालुका कोअरकमेटी वसीम खान व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते