Home जळगाव रावेर पोलीस मारहाण प्रकरणी चौकशि अंतिम टप्प्यात

रावेर पोलीस मारहाण प्रकरणी चौकशि अंतिम टप्प्यात

1001

रावेर (शेख शरीफ)

रावेर पोलीस स्टेशन येथे ३ व ४ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्यांक समाजातील काही मुलांना पोलीस निरीक्षक कैलास नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलीस निरीक्षक विशाल सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील व इतर कर्मचारी यांच्याकडून मोहम्मद बाबर व इतर युवकांना बंदिस्त ठेवून, डांबून ठेवून, मारहाण करून त्यांच्याकडून पैशाची मागणी करण्याबाबत तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्या बाबत चौकशी सुरू असून सोमवारी रावेर पोलीस स्टेशन चे सहा पो निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांचे जाब जबाब घेण्यात आले असून संध्याकाळी सारा हॉस्पिटल मधील ऍडमिट पेशंट यांची सुद्धा चौकशी करण्यात आली अशा प्रकारे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक सुनील चौधरी व रीडर पो कॉ विजय सोनवणे , अजय पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय , जळगांव येथे व सारा हॉस्पिटल येथे चौकशी करून जाबजबाब नोंदविले.