प्रशांत नाईक – धामणगांव रेल्वे
आज दि.08/11/2021रोजी चांदुर रेल्वे आगारात चालू असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या उपोषण स्थळी भेट देऊन त्यांच्या न्याय हक्काच्या आंदोलनात सहभागी असल्याचे व आंदोलनाला जाहीर पाठिंबा असल्याचे मत वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. निलेशभाऊ विश्वकर्मा यांनी व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा श्रद्धेय मा. बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी पक्ष महाराष्ट्र प्रदेश एस. टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होई पर्यंत व न्याय मिळेपर्यंत सोबत राहणार असल्याचे मत यावेळी मा. निलेशभाऊ विश्वकर्मा यांनी व्यक्त केले.यावेळी असंख्य उपोषण कर्ते एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांनि वंचित बहुजन आघाडी व निलेश भाऊ विश्वकर्मा यांचे आभार मानले