Home जळगाव एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा

एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा

451

तहसिलदार यांना दिले निवेदन

रावेर (शेख शरीफ)

रावेर येथे ८ नोव्हेंबर २०२१ रोजी नायब तहसिलदार संजय तायडे यांना दिलेल्या ‍निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात एस टी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणास वैतागून स्वतःचे जीवन संपवले आहे. राज्य सरकार आणि विरोधी पक्ष हे मात्र एस टी कर्मचान्यांच्या जीवाशी खेळत असून त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही. पाच वर्षे सत्तेत असताना भाजप-शिवसेना या पक्षाने एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत. आणि आता सत्तेत बसलेले शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांनीही कामगारांच्या प्रश्नांपासून पळ काढलेला आहे. एस टी आगारात सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला दडपण्यासाठी कर्मचाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याच्या तसेच नोकरीवरून निष्कासित करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. बंचित बहुजन आघाडी एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देत असून सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सोबत घेऊन स्थानिक एस टी आगारात सुरू असलेल्या आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दिला. तसेच एस टी चे वरिष्ठ अधिकारी जर कर्मचाऱ्यांना धमकावत असतील तर त्यांच्याशी संवाद साधून आंदोलन एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आणि रावेर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन कर्मचाऱ्यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले.

सदर निवेदनाच्या प्रति,

१) आगार प्रमुख एस टी महामंडळ रावेर ता रावेर

२) पोलीस निरीक्षक रावेर पोलीस स्टेशन रावेर ता रावेर

यांना दिल्या आहे.

सदर निवेदनावर वंचित बहुजन आघाडी रावेर तालुका अध्यक्ष बाळू राजाराम शिरतुरे, रावेर तालुका उपाध्यक्ष सलीम शाह यासीम शाह ,रावेर तालुका सचिव विनोद तायडे, रावेर तालुका संघटक उमेश सवर्णे, रावेर शहर उपाध्यक्ष दौलत अढागळे, कंदरसिंग बारेला, चंदरसिंग बारेला यांच्या सहया आहे.