Home विदर्भ संत नगरी शेगाव येथे आदिवासी समाजाचे महाअधिवेशन संपन्न.

संत नगरी शेगाव येथे आदिवासी समाजाचे महाअधिवेशन संपन्न.

469

 

प्रतिनिधी-: धनराज खर्चान

दि.७/११/२०२१ रोजी रविवार ला आदीवासी समन्वय समिती, आदिवासी संघर्ष समिती,आदिवासी कोळी महासंघ, आदिवासी कर्मचारी संघटना, आदीवासी जमसंघटना च्या वतीने डॉ.दशरथजी भांडे साहेब (माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या नेतृत्वात श्री.संत गजानन महाराजांच्या पावन भूमी शेगाव जि.बुलढाणा येथे आदिवासी जमात बंधू भगिनींचे राज्यव्यापी महाअधिवेशन थाटात संपन्न झाले. या अधिवेशनाची सुरुवात रामायण रचियेते, आद्यकवी महर्षी वाल्मीली यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.त्यानंतर आदिवासी नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आदिवासी कोळी समाजातील लिटिल चॅम्प या कार्यक्रमात उत्कृट गायन करणारी श्रुती भांडे हिचा व कोण बनेगा करोडपती या मालिकेतील एक कोटी रुपयांचे बक्षीस जिकणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथील अंगणवाडी मदतनीस बबीताताई ताडे यांच्या सुद्धा सत्कार भांडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातील आदिवासी जमात बांधव मोठया संख्येने उपस्थित झाले होते,’हर हर महादेव’व ‘महर्षी वाल्मिकी ‘ यांच्या जयघोषानी सर्व परिसर दुमदुमून गेला होता. डॉ.दशरथजी भांडे साहेब,यांनी आपल्या मनोगतातून आदिवासी जमात बांधवावर होत असलेला अन्याय,आदिवासी समाज बांधवांची आजची विदारक स्थिती यावर प्रकाश टाकला,व आम्हा आदिवासी समाज बंधू भगिनी वरील अन्याय दूर करून,आम्हाला न्याय मिळवून द्यावा,आम्हाला आमचे हक्क व अधिकार मिळवून द्यावेत अशी मागणी या राज्यव्यापी महाअधिवेशनाच्या माध्यमातून व्यक्त केली.
या अधिवेशनाला श्री.नाना पटोले (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस),श्रीमती यशोमती ठाकूर (महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य.) श्री.बळवंत वानखडे (आमदार,दर्यापूर विधानसभा),श्री.अमोल मिटकरी (आमदार विधानपरिषद) ,श्री.संजय कुटे (आमदार, जळगाव जामोद विधानसभा),चंद्रकांत पाटील आमदार मुक्ताईनगर जळगाव श्री.हरिभाऊ मोहोड श्री.दिलीपकुमार सानंदा, श्री.राहुल बोंद्रे, श्री.उल्लासदादा पाटील,तसेच असंख्य मान्यवर,व असंख्य समाजबांधव उपस्थित होते. महाधिवेशन यशस्वी करण्याकरिता अमरावती,अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम तसेच ईतर जिल्यातील आदिवासी जमात बांधवांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.तायडे सर,श्री,गजानन कासमपुरे सर,श्री.शैलेंद्र दहातोंडे यांनी केले,तर आभार प्रदर्शन श्री.शैलेंद्र दहातोंडे यांनी केले.