Home परभणी दुष्काळी अनुदानाचे वाटप तात्काळ करा – सखाराम बोबडे पडेगावकर

दुष्काळी अनुदानाचे वाटप तात्काळ करा – सखाराम बोबडे पडेगावकर

408

प्रतिनिधि गंगाखेड

ओल्या दुष्काळाचे जाहीर झालेले अनुदान तात्काळ वाटप करावे अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुका अधिकारी यांच्याकडे सखाराम बोबडे पडेगावंकर व सहकार्यानी प्रत्यक्ष भेटून बुधवारी करण्यात आली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गंगाखेड येथील शाखेत तालुक्याचे अधिकारी यांच्याशी बुधवारी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे, प्रसिद्ध भागवत कथा प्रवक्ते शिवाजी महाराज बोबडे आदींच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. तहसील कार्यालयाकडून अनुदानाच्या याद्या येऊनही आणखी अनुदान वाटपास सुरुवात झालेली नाही .तरी आपण यास कोणतेही कारण न लावता तात्काळ अनुदान वाटप करावे अशी मागणी तालुका अधिकाऱ्याकडे करण्यात आली. तालुका अधिकाऱ्यांनी अनुदान येत्या दोन दिवसात वाटप सुरु करण्यात येईल अशी माहिती दिली. यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर, माजी सरपंच जयदेव मिसे, प्रसिद्ध वक्ते शिवाजी महाराज बोबडे आदी उपस्थित होते.