⚫ मुख्य आरोपी विशाल राठोडसह तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी..?
अयनुद्दीन सोलंकी,
घाटंजी (यवतमाळ) – घाटंजी तालुक्यातील गोविंदपुर येथील एका अल्पवयीन मुलीला पळवुन नेउन अत्याचार केल्या प्रकरणी संशयीत आरोपी विशाल सुधाकर राठोड, रणजित रमेश राठोड व दर्शन प्रकाश जाधव विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 363, 366, 376 (2) (n), 354 – D, बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 अन्वये 3, 4, 11, 12 व 16 अंतर्गत गुन्हे नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पारवा पोलीसांनी आरोपी विशाल राठोडसह तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत यवतमाळच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सदर प्रकरणात पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे पुढील तपास करीत आहे. घाटंजी तालुक्यातील गोविंदपुर येथील एक अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रीणी सोबत शुक्रवारी गायगोधन असल्याने पुजनाचे गवत आणण्यासाठी तेथीलच रामा चव्हाण यांचे शेतात जात होते. दुपारी एक वाजता आरोपी विशाल राठोड हा सदर अल्पवयीन मुलीला शेतात भेटुन आपण पुणे येथे जाउ म्हणून बळजबरी करुं लागला. तेव्हा त्याचेसोबत असलेला त्याचा मित्र रणजित रमेश राठोड याने सुद्धा तु विशाल सोबत पुणे येथे जा, असे म्हणाला. तेव्हा विशाल राठोड याने बळजबरीने त्या मुलीचा हात पकडून कुर्ली वन विभागाच्या जंगला पर्यंत पायदळ नेले. तेथे नंतर दर्शन जाधव हा दुचाकी मोटर सायकल घेऊन तेथे आला. त्या नंतर अल्पवयीन मुलगी, विशाल व दर्शन हे तिघेही ट्रिपल सिट पारवा येथील पेट्रोल पंपानजीक थांबले. त्या नंतर पुणे येथे जाण्यासाठी खाजगी वाहनाने ते दोघेही घाटंजी पर्यंत गेले. सदर अल्पवयीन मुलगी घरी नसल्याने लक्षात आल्याने तिचे नातेवाईक चेतन जाधव, ज्ञानेश्वर जाधव, रामेश्वर जाधव, गोलु राठोड असे शोध घेउ लागले. त्या वेळी सदर अल्पवयीन मुलीला घाटंजी येथील बस स्थानकाजवळ विशालच्या तावडीतून सुटका करून घरी आणले. सदर अल्पवयीन मुलगी ही घाटंजी येथील एस. पी. एम. गिलाणी महाविद्यालयात दहाव्या वर्गात शिकत होती. ती शिकत असतांना आरोपी विशाल हा नेहमी नेहमी तिला भेटून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे वारंवार सांगत होता. तसेच सदर अल्पवयीन मुलीवर दसऱ्याच्या अगोदर व नंतर दोन ते तीन वेळा यवतमाळ तालुक्यातील येळाबारा येथील जंगलात अत्याचार केल्याचे सदर अल्पवयीन मुलीने आपल्या तक्रारीत नमुद केले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे करीत आहे.