Home विदर्भ काही जणांना मारेक-यांचा संताप येण्यापेक्षा आपण सरळ अशिक्षित म्हणून ज्याची धमकी देता...

काही जणांना मारेक-यांचा संताप येण्यापेक्षा आपण सरळ अशिक्षित म्हणून ज्याची धमकी देता व ज्याच्यावर डॉ. नाधमकविल्याचा आरोप आहे तो संतोष ढवळे…

3109

प्रवीण भाऊ पांडे यांचे मत……

यवतमाळ संतोष ढवळे हे तथाकथित कार्यकर्ते नसून सच्चे कार्यकर्ते आहेत हे आपल्या शिवाय कदाचित सर्वांनाच माहीत आहे . संतोष ढवळे घटना कळल्यावर त्या ठिकाणी सर्वप्रथम धावून गेले आणि स्व. डॉ अमोल ला घटनास्थळावरून तातडीने उपचारार्थ नेणारे अनिल यादव व निलेश बेलोकार हे ही त्यांचे सहकारीच होते व संपूर्ण campus चे प्रवेशद्वार लावल्यानंतर गेटबाहेर रुग्णांची संख्या वाढली…बरेच तास गेल्यानंतर काही गंभीर रुग्ण,ज्यात एकाला रक्ताची उलटी झाली तर एकाला ऑक्सिजन ची गरज होती त्यांना उपचार मिळणे अतिआवश्यक होते म्हणून संतोष ने विनंती केली…संताप अनावर झाले असलेल्या डॉक्टर मंडळींनी भावनेच्या आहारी जाऊन गेट उघडणार नाही असे म्हणून रोष व्यक्त केला तो पर्यंत त्या ठिकाणी मा. जिल्हाधिकारी , मा.पो.अधीक्षक दाखल झाले होते. त्यांनीही विनंती केली परंतु वातावरण तंग असल्यामुळे आंदोलनकर्ते काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते… त्यात सर्व राग संतोष वर आला. पोलिसांनी त्यांना तेथून बाहेर नेले.खरं तर आंदोलकर्त्यांनी एकट्या संतोषभाऊंना चर्चेसाठी स्वताहून आत येण्यास सहमती दर्शविली होती हे हि तेवढेच महत्वाचे.
काळरात्री उशिरा काही तरी शिजले व संतोष विरुद्ध तक्रार दाखल करून गुन्हे दाखल करण्यात आले.
घटनास्थळी जर गुंडगिरी झाली असती तर उपस्थित प्रशासनाने स्वताहून कार्यवाही केली असती आणी राहिला प्रश्न संतोष चा रुग्ण सेवेचे त्याला वेड आहे…कोविड काळात जीवावर उदार होऊन रात्रंदिवस रुगणांची सोय करण्यासाठी धडपडणाऱ्या संतोष ने अनेकांना जेवण , vapouriser , फळे एव्हढेच नव्हे तर कोविड काळात वॉर्डात जाऊन रुग्णांना धीर देऊन,त्याचे हातपाय दाबून दे,बेडसोल्स होऊ नये म्हणून एयरबेड उपलब्ध करून दे ,अशी कामे केली ( बेकायदा कोविड वार्डात गेले म्हणून त्यांची तक्रारही करण्यात आली ) पञकार बल्लू भागवते अति गंभीर होते तेव्हा संतोष केवढा आधार होता ,हे त्यांना विचारू शकता…नातेवाईक किंवा घरचेही दवाखान्यात जाण्यास कचरत होते,तेव्हा ही ‘आक्रमक समाजसेवा’ कामी आली. मी स्वतः अति गंभीर होतो (1 महिना मुक्काम-सर्व विधी बेडवरच-venti वर होतो ) त्यावेळेस इतरांप्रमाणेच माझ्यासाठी संतोष ने जे केले त्याला तोड नाही… त्याच्यामुळेच या जगात मी जिवंत आहो,ही माझी भावना आहे.
बाबूजी,केवळ रुग्णांचे हाल बघवत नव्हते म्हणून गेट उघडा असे म्हणणाऱ्या संतोष वर गुन्हे दाखल झाले.
यवतमाळ शासकीय दवाखाण्याचे परिसर गेट लावून बंद करणे हा गुन्हा आहे की उघडा म्हणणे हा गुन्हा आहे.
त्यानंतर मा.पालकमंत्री व आ.संजय राठोड यांनी आंदोलांकर्त्या डॉक्टरांना समजावून सांगितले व त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून तब्बल चार वेळा माफी मागितली आहे.आंदोलांकर्त्या डॉक्टरांच्या भावना लक्षात घेता कोणीही हा विषय वाढविला नाही हे विशेष. या सगळ्यात संतोष वर अन्याय झाला असे वाटते.
आणि हो…तो कधीही स्वाताच्या नावापुढे लावत नाही,पण संतोष स्वतः डॉक्टर आहे…हे अनेकजणांना माहितीच नाही आणि संतोष ने पण तसे प्रदर्शन कधी केले नाही…ते तुमच्या म्हणल्याप्रमाणे ‘अशिक्षित’निश्चित नाही…
तूर्तास एव्हढेच