Home नांदेड आमच्या गोरगरीब,तुटपुंज्या पगारावर,कंत्राटी,बंधपात्रित आणि खाजगी नर्सेस साठी जर कोणता उमेदवार चार-चार दिवस...

आमच्या गोरगरीब,तुटपुंज्या पगारावर,कंत्राटी,बंधपात्रित आणि खाजगी नर्सेस साठी जर कोणता उमेदवार चार-चार दिवस रस्त्यावर बसल्या असेल तर दाखवा,मी माझा प्रचार करणार नाही.

989

माझे सर,माझा मित्र,आमचे मॅडम, आमच्या ओळखीचा आहे म्हणून मतदान करु नका तर त्या उमेदवारांचे काम पाहूनच निवडून दया- आदी उर्फ राहुल बनसोडे

नांदेड ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई निवडणूक मराठवाडा विभागातुन पुर्ण 17 उमेदवार लढवत असून, जो माणूस स्वतःचा विचार न करता,नर्सेस च्या अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठवतो, जेव्हा तुम्ही अडचणीत होतात तेव्हा कोण संपर्कात होते, संकटसमयी धावून आला त्यालाच निवडून द्यावे,मागील तीन ते चार वर्षांपासून नर्सेस व आरोग्य विभागातील विविध प्रश्न घेऊन सातत्याने, पाठपुरावा करत न्याय मिळवून देण्याचे काम केले..

1) मराठवाड्यातील नांदेड येथे नर्सेसचे INC व MNC चे registration चे कॅम्प आयोजित करुन हजारो registration करण्यात आले.
2) मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यातील खाजगी हाॅस्पिटल मधील बोगस स्टाफ संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली.
3) मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यातील खाजगी हाॅस्पिटल मध्ये सेवा देणाऱ्या नर्सेसना समान वेतनासाठी विविध कार्यालयात निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
4) बोगस स्टाफ व समान वेतन लागू करण्यासाठी प्रशासन व खाजगी हाॅस्पिटल चालवणाऱ्या विरोधात बंड पुकारल्याने पोलिस स्टेशन नांदेड खोटा गुन्हा नोंदून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असता सहकार्यामुळे रद्द करण्यात आला.
5) कोव्हिड कर्मचाऱ्यांची होत असलेली मनमानी भरतीला विरोध करुन मेरीट लिस्ट प्रमाणे भरती करण्यास भाग पाडले.
6) मराठवाड्यातील कोव्हिड कर्मचाऱ्यांना राहण्याची जेवणाची व्यवस्था संदर्भात मागणी करुन मिळवून दिले.
7) नर्सेसवर अन्याय अत्याचार विरोधात 5 जून ब्लॅक डे म्हणून निषेध करण्यात आले.
8) शासकीय नर्सेसच्या विविध मागण्या संदर्भात काम बंद आंदोलनाला सक्रिय सहभाग नोंदविला.
9) परराज्यातील नर्सेसना ड्युटी साठी काम आदेश दिले होते तो रद्द करण्यासाठी निवेदनावर मागणी करून निदर्शनं करण्यात आले.
10) शासकीय अनेक भरतीमध्ये येन एम नर्सिंग जना डावलण्यात आले होते त्या संदर्भात येणे नर्सेसना प्राधान्य या संदर्भात मागणी करून न्याय मिळवून दिला .
11)मराठवाड्यातील नर्सेस अपशब्द बोलणार्‍याला वर गुन्हा नोंद करा व कोव्हिड कर्मचाऱ्यांना अनेक हल्ल्यासंदर्भात गुन्हा नोंद व्हावा यासाठी पाठपुरावा केला.
12) हजारो नर्सेस सोबत घेऊन शासकीय सेवेत कायम करा यासाठी सत्याग्रह करण्यात आला.
13) महाराष्ट्रातील कोव्हिड कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा या मागणीसाठी अनेक आमदार खासदार व थेट आरोग्यमंत्र्यांना भेटून निवेदनाद्वारे मागणी केली.
14) औरंगाबाद मधील आरोग्य विभागाच्या परिक्षेचा काळाबाजार उघड केला.
15) बंधपात्रित नर्सेसना शासकीय सेवेत कायम करा या मागणीसाठी कामबंद आंदोलनात नांदेड जिल्ह्यातून सक्रीय पाठिंबा दर्शविला होता,
तसेच
नर्सिंग स्टाफ साठी विविध मागण्या घेऊन अन्याय अत्याचार विरोधात अनेक आंदोलने मोर्चे उपोषण करून राहुल उर्फ आदी बनसोडे यांनी सदैव न्याय मिळून देण्यासाठी कार्य केले आहे. एक युवक नर्सेसच्या कोणत्याही अन्याय विरोधात सक्रीय सहभाग घेऊन अत्याचार विरोधात बंड पुकारत असते, आणि अजुन माहिती जाणून घेण्यासाठी Adi Bansode या फेसबुकवर जाऊन काम पाहू शकता, त्यामुळे काम करणाऱ्या सच्चा कार्यकर्ताला वेळ आली आहे, अजुन जोमाने काम करण्यासाठी आपले आमूल्य मत देऊन निवडून द्यावे म्हणून आपल्या पुढं हक्काने मागतो आहे,
येणाऱ्या बॅलेट पेपर वर अनु क्र.02 च्या पुढं राहुल बनसोडे यांच्या नावासमोर × अशी फुल्ली मार्क देऊन नर्सेसची सेवा करण्यासाठी एकदा संधी द्यावी..!
मो:- 7743868217