अमीन शाह ,
आजच्या या विज्ञान युगात युवा पिढी आपल्या मना प्रमाणे वागत आहेत आई वडिलांच्या इज्जतीचा विचार न करता असे कार्य करत आहेत की त्यांच्या मुळे आई वडिलांना जीव देण्याची पाळी येत आहेत पुढचा विचार न करता टोकाचे निर्णय स्वतः घेत आहेत त्या मुळे आई वडिलांना पचयताप करण्याची पाळी आणत एक अशीच हुर्दय हेलावून टाकणारी घटना औरंगाबाद शहरात घडली लग्न घटिका जवळ आली डीजे , मंगल कार्यालय , केटर्स बुक केलं सर्व तय्यारी झाली असतांना लग्नाच्या चार दिवस अगोदर मुलगी पळून गेली बापाने मुलीची सर्वत्र शोध घेतलं तरीही मुलगी मिळून न आल्यामूळे इज्जतदार बापाने रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केल्याची दुःखदायक घटना घडली आहे ,
ही घटना औरंगाबाद शहराच्या संग्रामनगर उड्डाणपुलाच्या परिसरात घडली
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार संजय खंडूजी वाकेकर ( ४७ , रा . महूनगर , कमलनयन बजाज हॉस्पिटलसमोर , बीड बायपास ) असे मृताचे नाव आहे.विशेष म्हणजे हताश झालेल्या वडिलांनी आत्महत्येपूर्वी पत्नीला उद्देशून सुसाईड नोट लिहिली होती . त्यात प्रिय संगीता , मी तुम्हाला सोडून जात आहे . मुलीला आपल्या घरात घेऊ नको . मुलाचे चांगले लग्न लाव , संगीता , तुझी आठवण नेहमीच राहिल , असे नमूद करीत त्यांनी प्राण सोडले . मिळालेल्या माहितीनुसार , संजय वाकेकर हे खासगी गाडीवर चालक आहेत . त्यांची पत्नी संगीता धुणीभांडी करून कुटुंबाच . चरितार्थ चालवत होते . त्यांना एक मुलगा व मुलगी आहे . मुलगा कंपनीत नोकरी करतो . मुलगी घरीच होती . मुलीचे नात्यातील एका मुलासोबत नुकतेच लग्न जमवले होते . लग्नाची तारीखही काढण्यात आली . या लग्नाची जोरदार तयारी घरात चालली होती . डीजे , मंगल कार्यालयापासून सगळ्या गोष्टींचे बुकिंग केले होते . त्यासाठी लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला . सर्व कुटुंबासह नातेवाईक लग्नाच्या तयारी व्यस्त असताना मुलगी शनिवारी दुपारी ३ वाजता घरातून निघून गेली . या प्रकरणाची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली . मुलीचा शोध घेण्यासाठी संजय वाकेकर यांनी परिसर पालथा घातला . मात्र , ती सापडली नाही . मुलगी ऐन लग्नाच्या चार दिवस आधी घरातून पळून गेल्याने मुलीचे वडिल खचून गेले . खचलेल्या अवस्थेत त्यांनी संग्रामनगर उड्डाणपुलाखाली धाव घेतली अन् मालवाहू रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली . या घटनेने परिसरात हळहळ दुःख व्यक्त करण्यात येत आहे .