🔵 जिल्हा व सत्र न्यायालयाने दुसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला..?
घाटंजी, अयनुद्दीन सोलंकी
यवतमाळ / घाटंजी : पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवर येथील शेतीच्या वादावरुन कुर्लीच्या जंगलात दोन्ही गटात झालेल्या हाणामारीत रामसिंग चंदू राठोड व ईतरांना रस्त्यात अडवुन चाकु व लाकडी दांड्याने हल्ला केल्या प्रकरणी पारवा पोलीसांनी भादंवि कलम 307, 341 सह कलम 34 अन्वये आरोपी तुकाराम कनिराम राठोड, प्रमोद उर्फ वैभव विठ्ठल राठोड व ज्ञानेश्वर कनिराम राठोड विरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली होती. आरोपी तुकाराम राठोड याने अगोदर अँड. नेताजी राउत (घाटंजी) यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भंसाळी यांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अँड. ए. ए. मोहोड यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. तर आरोपीतर्फे अँड. नेताजी राउत (घाटंजी) यांनी बाजू मांडली. 🔵 पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवर भंडारी येथे शेतीच्या वादावरुन विष्णू राठोड हा आपल्या आईला मोटर सायकल वर बसवुन पारवा पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्या साठी जात होता. चिखलवर्धा पासुन काही अंतरावर असलेल्या कुर्ली येथील जंगलात आल्यानंतर शिवर येथील तुकाराम राठोड, ज्ञानेश्वर राठोड व प्रमोद उर्फ वैभव राठोड आदींनी विष्णु राठोड याची मोटर सायकल अडवुन शिवीगाळ करु लागले. विष्णू हा तुकारामशी बोलत असतांना ज्ञानेश्वर राठोड याने त्याचे कमरीतुन धारदार चाकु काढुन रामसिंग याच्या पोटात दोन तीन वेळा भोसकला होता. त्यानंतर तुकाराम राठोड याने तोच चाकु घेऊन रामसिंगच्या छातीवर व पाठीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले. फिर्यादी विष्णू राठोड व आई हे दोघेही मोटर सायकलवर बसुन असल्याने आईला मोटर सायकल वरून उतरवीत असतांना प्रमोद याने विष्णूच्या डोक्यावर लाकडी दांड्याने हल्ला केल्याने डोक्यातून रक्त वाहत होते. तसेच त्याला चक्कर येत असल्याने विष्णू व आई मोटर सायकल सह खाली पडले. त्या वेळी फिर्यादी सोबत असलेले गोविंदपुर येथील अर्जुन जाधव हे आपला जिव वाचविणायासाठी घटना स्थळावरून निघुन गेले. त्यानंतर आरोपी तुकाराम, ज्ञानेश्वर व प्रमोद हे तिघेही घटना स्थळावरून पसार झाले अशी लेखी तक्रार फिर्यादी विष्णू राठोड याने 7 जुलै रोजी पारवा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यावरुन रस्त्यात अडवुन खुन करण्याचा प्रयत्न करणेचा गुन्हा पारवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्या नंतर अटकेत असलेले आरोपी तुकाराम राठोड, प्रमोद राठोड व ज्ञानेश्वर राठोड यांनी दुसऱ्यांदा 14 आँक्टोंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भंसाळी यांनी तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळून लावला. या वेळी शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील अँड. विजय तेलंग यांनी युक्तिवाद केला. तर आरोपीतर्फे अँड. राजेश साबळे यांनी काम पाहीले. एकंदरीत सदर प्रकरणात दोन्ही गटां विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले होते.