Home नांदेड तोतया पोलिसाने बिल न देताच जेवण व दारूचे पार्सल घेऊन गेले ,...

तोतया पोलिसाने बिल न देताच जेवण व दारूचे पार्सल घेऊन गेले , “धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल”

985

महेंद्र गायकवाड

नांदेड –  धर्माबाद शहरातील एका बार मध्ये पोलीस असल्याची बतावणी करून तोतया पोलिसाने जेवण व दारूचे बिल न देता पार्सल घेऊन गेले या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात त्या तोतया पोलिसविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्माबाद येथील महाराजा बिअरबार येथे दिनांक 13 रोजी नोव्हेंबर रोजी पोलीस असल्याची बतावणी करून एका व्यक्तीने जेवण व दारूचे एकूण बिल 850 न देता निघून गेल्या प्रकरणी पोलीस नाईक नागमवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री .आबेद हे करीत आहेत .यापूर्वी जिल्ह्यातील अनेक भागात तोतया पोलसानी धुमाकूळ घातला असून खऱ्या पोलिसांपुढे खोट्या पोलिसांचे आव्हान निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.