Home जळगाव सातत्य व एकाग्रतेने अभ्यास ही स्पर्धा परीक्षेच्या यशाची गुरुकिल्ली आसीम खान(UPSC) यांचे...

सातत्य व एकाग्रतेने अभ्यास ही स्पर्धा परीक्षेच्या यशाची गुरुकिल्ली आसीम खान(UPSC) यांचे मत

148

रावेर (शेख शरीफ)

सै.अहमद शहीद रह.फाउंडेशन तर्फे संचलित स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र आयोजित चर्चासत्रात आसीम खान यांनी आपले विचार व्यक्त केले .

त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की यश अपयश ही स्पर्धा परीक्षेची एक अविभाज्य परिस्थिती आहे याचा सामना आत्मविश्वासाने केला पाहिजे.स्पर्धा परीक्षा अभ्यास केन्द्राची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभ्यास केंद्राचे संचालक रागिब अहमद यांनी अभ्यास केंद्राची माहिती करून दिली. त्यानंतर आसीम खान यांच्या सत्कार अभ्यास केंद्राचे विद्यार्थी तौसीफ खाटीक, सिद्दिक पटेल,आमीन पिंजारी, अज़हर शेख,सुफियान रंगरेज यानी केला तर आभार प्रदर्शन अहमद शहीद रहमतुल्लाअलै फाउंडेशनचे सहसचिव इमरान खान यांनी केले .कार्यक्रमास प्राध्यापक शफीकुर्रहमान, अब्दुल रहीम सर ,सय्यद दानिश,आमिर खान सर, उपस्थित होते