Home मराठवाडा विद्यार्थी, शेतकरी,क्लासमेटग्रुप यांचा एसटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा

विद्यार्थी, शेतकरी,क्लासमेटग्रुप यांचा एसटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा

224

एस टी टिकण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी, तरूण रस्त्यावर

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना – शालेय विद्यार्थी व शेतकरी आणि क्लासमेट ग्रुपचे तरूण यांनी एसटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.तसेच गावात निधी संकलन करून कर्मचाऱ्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाला आर्थिक मदत केली आहे.

एस टी कामगारांनी पुकारलेल्या संपाला आता विद्यार्थी व शेतकऱ्यांनी तसेच कुंभार पिंपळगाव येथील सरस्वती भुवन शाळेतील १९९८ मध्ये शालांत परीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अधिकृत सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी हाॅट्सप ग्रुप तयार केला असून त्या माध्यमातून त्यांनी एसटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कर्मचारी बांधवांना गावागावात फिरून निधी संकलन करुन व एस टी महामंडळाच्या विलीनीकरणसाठी पाठिंबा मिळवणार आहेत.

यावेळी विद्यार्थी विष्णू नाझरकर,सुनिल गायकवाड,पोपट खंडागळे,शेतकरी विजय नाझरकर,सरपंच बळीराम शेडगे,दिपक नाझरकर,साळीकराम बाळसराफ,रोहित बनसोडे,अरबाज काझी,अर्जुन शेडगे,प्रभू बाम्हणे,सतीश ढोणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया

“एक विदयार्थी म्हणून माझ्यासाठी एस टी चे योगदान राहिले आहे. एस टी नसती तर माझे शिक्षण पूर्ण झाले नसते. एस टी टिकली पाहिजे म्हणून आंदोलकर्त्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून
आम्ही कायम उभे राहू, आंदोलनासाठी गावागावात फिरू आणि आर्थिक मदत गोळा करु. लागेल ती मदत करु.”
– विष्णू नाझरकर