Home नांदेड येसगी येथील नवीन पुलावरील वाहतूक बंद; जुन्या पुलावरून 20 टन पेक्षा कमी...

येसगी येथील नवीन पुलावरील वाहतूक बंद; जुन्या पुलावरून 20 टन पेक्षा कमी क्षमतेच्या वाहतुकीस मुभा-जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर

495

महेंद्र गायकवाड

नांदेड – येसगी येथील जुन्या पुलाची अत्यावश्यक दुरुस्ती करण्यात आली असून 20 टन वाहन भार क्षमतेपेक्षा कमी भार असलेल्या वाहतुकीस मुभा दिली आहे.
याचबरोबर नवीन पुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केली आहे.

ही अधिसूचना 17 नोव्हेंबर 2021 च्या सकाळी 6 वाजेपासून पुढील आदेशापर्यत कायम राहील. रस्ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह, चिन्ह लावणे इत्यादी बाबतची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केल्या जात आहे.